AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder : वर्षाच्या अखेरीस पुन्हा महागाईच्या झळा; गॅस सिलेंडर महागला, सलग पाचव्यांदा ग्राहकांचा खिसा कापला

LPG Cylinder Price Hike : 1 डिसेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीसह अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हा बदल ग्राहकांचा खिसा कापतो, अथवा त्यांना मोठा दिलासा देतो. वर्षाअखेरीस ग्राहकांना महागड्या गॅस सिलेंडरने दणका दिला आहे. इतक्या वाढल्या किंमती?

LPG Cylinder : वर्षाच्या अखेरीस पुन्हा महागाईच्या झळा; गॅस सिलेंडर महागला, सलग पाचव्यांदा ग्राहकांचा खिसा कापला
गॅस सिलेंडर किंमत
| Updated on: Dec 01, 2024 | 9:52 AM
Share

निवडणूक काळात सरकार आणि सरकारी तेल कंपन्या कोणतीही दरवाढ शक्यतो लागू करत नाही. पण एकदा निवडणुका झाल्या की मग महागाईला फोडणी बसते. या महिन्याच्या पहिल्या तारखेला, 1 डिसेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हा बदल ग्राहकांचा खिसा कापतो, अथवा त्यांना मोठा दिलासा देतो. वर्षाअखेरीस ग्राहकांना महागड्या गॅस सिलेंडरने दणका दिला आहे. विशेषण म्हणजे केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इतक्या वाढल्या किंमती?

घरगुती सिलेंडरचा दर स्थिर

तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. तर 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या आघाडीवर सरकारने भाव स्थिर ठेवले आहेत. तर काही महिन्यांपूर्वी त्यावर सबसिडी जाहीर केली होती. त्यामुळे 1100 रुपयांच्या घरात मिळणारा सिलेंडर आता 800 ते 900 रुपयांदरम्यान मिळत आहे.

व्यावसायिक गॅसच्या किंमतीत किती वाढ?

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली. सलग पाचव्यांदा ही दरवाढ करण्यात आली आहे. 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमती 16.50 रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर देशातील चार प्रमुख शहरातील व्यावसायिकांना आता गॅस सिलेंडरसाठी जादा किंमत मोजावी लागेल. त्यानुसार, दिल्लीत गॅस सिलेंडर आता 1818.50 रुपयांना मिळेल. तर मुंबईत 1771 रुपये, कोलकत्तामध्ये 1927 रुपये आणि चेन्नईत 1980 रुपयांना गॅस सिलेंडर मिळेल. या दरवाढीमुळे हॉटेलिंग महाग होणार आहे. खाद्यपदार्थांसाठी जादा किंमत मोजावी लागू शकते.

घरगुती गॅस सिलेंडरचा भाव काय?

14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मोदी सरकारच्या काळात 400 रुपयांच्या गॅस तिप्पट झाल्याचा आरोपा विरोधकांनी केल्यानंतर किंमतीत कपातीचे धोरण स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर 1100 रुपयांहून गॅस दर खाली घसरले. आता दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 803 रुपये, कोलकत्त्यात 829 रुपये, मुंबईत हा दर 802.50 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅसची किंमत 818.50 रुपये आहे. उज्ज्वला सिलेंडर योजनेतील ग्राहकांना सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्यात येते.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.