आता फक्त 30 मिनिटांत घरी येणार LPG सिलिंडर, ‘या’ तारखेपासून सेवा सुरू

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOC) ने एलपीजी तत्काळ एलपीजी सेवा (Tatkal LPG Seva) सुरू करण्याची योजना आखली आहे.

आता फक्त 30 मिनिटांत घरी येणार LPG सिलिंडर, 'या' तारखेपासून सेवा सुरू
how to get lpg subsidy

नवी दिल्ली : LPG गॅस सिलिंडर बुकिंगकेल्यानंतर (LPG gas cylinder booking) आधी आपल्या 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागायची. पण आता तुम्हाला वाट पाहण्याची काही आवश्यकता नसणार आहे. कारण, सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOC) ने एलपीजी तत्काळ एलपीजी सेवा (Tatkal LPG Seva) सुरू करण्याची योजना आखली आहे. यामुळे आता तुम्हाला अवघ्या अर्ध्या तासात घरात गॅस सिलिंडर मिळणार आहे. म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही सिलिंडर बुक कराल त्याच दिवशी तुम्हाला सिलिंडर मिळेल. (LPG Gas Cylinder ioc make plan to start tatkal lpg seva customers with in 30 to 45 minutes)

30 ते 45 मिनिटांत घरी पोहोचणार सिलिंडर

बिझिनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार, आयओसीने प्रत्येक राज्यातील एक शहर किंवा जिल्हा निवडणार असून तिथेच आधी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेद्वारे कंपनी 30 ते 45 मिनिटांत ग्राहकांना सिलिंडर घरपोच देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर अद्याप काम सुरू असल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांकडून देण्यात आली आहे.

1 फेब्रुवारीपासून सुरू होणार सेवा

आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी ही खास सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करता येईल यासाठी मोठ्या पातळीवर टीम काम करत आहे. आयओसी त्यांच्या ग्राहकांना इंडेन ब्रँड अंतर्गत सिलिंडर पुरवते. सध्या देशामध्ये 28 कोटी एलपीजी ग्राहक आहेत, त्यापैकी 14 कोटी ग्राहक इंडेन गॅस वापरतात.

या सेवेसाठी किती असेल शुल्क ?

आयओसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्काळ एलपीजी सेवेचा किंवा ‘सिंगल डे डिलीव्हरी सर्व्हिस’चा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना थोडीफार किंमत मोजावी लागणार आहे. हा शुल्क नेमका किती असेल? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (LPG Gas Cylinder ioc make plan to start tatkal lpg seva customers with in 30 to 45 minutes)

संंबंधित बातम्या – 

IRCTC IPO च्या भरघोस कमाईनंतर रेल्वे आणतोय आणखी एक IPO; कमाई करण्याची उत्तम संधी

वर्षाला करा 25000 रुपयांची गुंतवणूक, निवृत्तीनंतर मिळणार पूर्ण 38 लाख रुपये

(LPG Gas Cylinder ioc make plan to start tatkal lpg seva customers with in 30 to 45 minutes)

Published On - 6:05 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI