AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Hike: सणासुदीतच ग्राहकांना मोठा झटका, तुमचा गॅस सिलेंडर किती महागला? पटापट किंमत जाणून घ्या

LPG Price Hike Today 1 October: ऐन सणासुदीतच ग्राहकांना मोठा झटका बसला. त्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. आज 1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहे. काय आहेत आता किंमत?

LPG Price Hike: सणासुदीतच ग्राहकांना मोठा झटका, तुमचा गॅस सिलेंडर किती महागला? पटापट किंमत जाणून घ्या
गॅस सिलेंडर महागला
| Updated on: Oct 01, 2026 | 7:24 AM
Share

LPG Price Hike Today 1 October: देशात सण-उत्सवाचे वातावरण आहे. सणासुदीची धामधूम सुरू झाली आहे. त्यातच आज तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईची झळ बसली. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली. मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत 2,701 रुपये होती. आता 63 रुपयांनी महाग होऊन गॅसची किंमत 2764 रुपये इतकी झाली आहे. तर घरगुती गॅसची किंमत 941.5 रुपयांवर स्थिर आहे. लेहपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून ते पूर्वोत्तर राज्यापर्यंत 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. तर हॉटेलिंग आणि फराळ महागण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि चेन्नईत भाव काय?

इंडियन ऑईलने नवीन दर जाहीर केले. त्यानुसार दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून 62.50 रुपयांपासून महागला. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक सिलेंडर गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 9.50 रुपयांनी महागला. व्यावसायिक गॅस सिलेंडर 2747.50 रुपयांवर पोहचला. चेन्नईमध्ये सिलेंडर आता 2983 रुपये इतका झाला आहे. सप्टेंबरमध्ये ही किंमत 2916.50 रुपये इतकी होती. तर घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 957.5 रुपये इतकी आहे.

सर्वाधिक महाग सिलेंडर कुठे?

लेहमध्ये गॅस सिलेंडर सर्वाधिक महाग आहे. येथे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1179 रुपये इतकी आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेडर आता 3385.5 रुपयांऐवजी 3450 रूपयांना मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 64.50 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकार पात्र ग्राहकांच्या बँक खात्यात थेट LPG सबसिडी जमा करते. सध्या PMUY ग्राहकांसाठी केंद्र सरकारने 300 रुपये प्रति 14.2 किलो सिलेंडरपर्यंत, वर्षात 12 रिफिलवर सबसिडी देण्याची तरतूद केली आहे.

एलपीजीची किंमत कशी होते निश्चित?

इंडियन ऑईलनुसार, LPG किंमत वाढ अथवा कमी होण्याचा परिणाम लागलीच दिसतो. किंमती निश्चित करण्यासाठी जागतिक LPG भाव बेंचमार्क म्हणून वापरल्या जातात. OMCs गेल्या महिन्याच्या सरासरी बेंचमार्क अथवा परदेशी चलन विनिमय दराच्या आधारे किंमत निश्चित करते.  आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...