AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेशेल्स ट्रीपची प्लॅनिंग करतोय, येता का?; साधूकडून चित्रा रामकृष्ण यांना आणखी एक मेल; सेबीकडून चौकशी सुरू

भारतामधील सर्वात मोठा शेअर बाजार 'एनएसई' (NSE)  हा आहे. या माध्यमातून दररोज कोट्यावधीचा व्यवहार होतो. सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या एनएसईचा कारभार एका अज्ञात शक्तीच्या इशाऱ्यावर चालतो असा दावा एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांनी केला होता. आता याच अज्ञात शक्तीने त्यांना केलेला मेल समोर आला आहे.

सेशेल्स ट्रीपची प्लॅनिंग करतोय, येता का?; साधूकडून चित्रा रामकृष्ण यांना आणखी एक मेल; सेबीकडून चौकशी सुरू
NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण
| Updated on: Feb 19, 2022 | 7:36 PM
Share

नवी दिल्ली : भारतामधील सर्वात मोठा शेअर बाजार ‘एनएसई’ (NSE)  हा आहे. या माध्यमातून दररोज कोट्यावधीचा व्यवहार होतो. सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या एनएसईचा कारभार एका अज्ञात शक्तीच्या इशाऱ्यावर चालतो असा दावा एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांनी केला होता. ही अज्ञात व्यक्ती म्हणजे कोणी माणूस नसून ती हिमालयातील एक अदृश्य शक्ती असल्याचे तसेच आपण या शक्तीसोबत इमेलद्वारे संवाद साधला असल्याचे देखील चित्रा यांनी म्हटले होते. आता या प्रकरणातील आणखी एक मेल समोर आला आहे. सध्या एनएसईची ‘सेबी’कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान या मेलचा खुलासा झाला आहे. संबंधित योगीने चित्रा रामकृष्ण यांना एक मेल पाठवला आहे, या मेलमध्ये त्याने सेशेल्स ट्रीपचा (Seychelles trip) उल्लेख केला आहे.

मेलमध्ये नेमके काय म्हटले

चित्रा रामकृष्ण आणि संबंधित योगीच्या संभाषणाचा एक ईमेल समोर आला आहे. या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. या ईमलमध्ये संबंधित योगीने चित्रा यांना म्हटले आहे की, ‘मी सेशेल्स ट्रीपचे आयोजन केले आहे. तुम्ही येणार आहात का? येणार असल तर आजच बँगा भरा. तुम्हाला पोहता येते का? जर तु्म्हाला पोहता येत असेल तर आपण तेथील समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊ, तसेच तेथील बीचवर विश्रांती घेऊ’ हा मेल समोर आल्याने सेबी अधिकाऱ्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सेशेल्स हे कधी काळी टॅक्स हेवन म्हणून ओळखले जात होते. दरम्यान सेबीच्या चौकशीमधून याप्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्याता आहे.

वीस वर्षांपूर्वी साधूला भेटल्याचा दावा

तुम्ही या साधूला कधी भेटला होता असा सवाल सेबीच्या अधिकाऱ्यांकडून चित्रा यांना करण्यात आला. तेव्हा आपण या साधूला विस वर्षांपूर्वी गंगा नदीच्या किनाऱ्यावर भेटल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझी या साधूशी भेट झाली, त्यानंतर मी अनेक वर्ष माझ्या वयक्तीक आणि व्यवसायिक समस्यांवर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होती असे देखील त्यांनी म्हटले आहे. संबंधित साधूने मला एक आयडी दिला आहे, या ईमलआयडीवरूनच आम्ही ऐकोंएकांच्या संपर्कात होतो असा दावा देखील चित्रा यांनी केला असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

या मेगा IPO मध्ये 1 कोटी किरकोळ गुंतवणूकदार सहभागी होण्याची शक्यता, 25 हजार कोटी जमा होण्याचा अंदाज!

अत्यंत महत्वाची माहिती…गुंतवणूक करण्याच्या अगोदर जाणून घ्या व्याज उत्पन्नावर कर कसा लागू होतो!

तरूण मंडळी विकत घेत आहेत घर, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये घराची वाढू लागलीय मागणी!

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.