HDFC बँकेत मोठ्या बदलांच्या हालचाली; बँक खाती आणि क्रेडिट कार्डात काय बदल होणार?

बँकेची धोरणे आणि रचनात्मक बदलांसह क्रेडिट कार्डांमध्येही मोठे बदल होणार आहेत. | HDFC bank

मुंबई: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत मोठे धोरणात्मक बदल होणार आहेत. याचा प्रभाव HDFC बँकेचे ग्राहक आणि संबंधित गोष्टींवर पडणार आहे. या नव्या बदलांमुळे एचडीएफसी बँकेची स्थिती सुधारण्याबरोबरच ग्राहकांनाही नवे फायदे मिळणार असल्याचे सुतोवाच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी जगदीशन यांनी केले. (HDFC bank restructuring focus on 3 key areas)

त्यानुसार बँकेचे व्यावसायिक कार्यक्षेत्र, पुरवठा स्रोत आणि तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. तसेच बँकेच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनाही नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. HDFC बँकेच्या कॉर्पोरेट विभागाचे विद्यमान प्रमुख राहुल शुक्ला यांच्याकडे वाणिज्य बँकिंग आणि ग्रामीण कार्य हा नवा पदभार सोपवण्यात आला आहे.

ग्राहकांना काय मिळणार?

बँकेतील नव्या बदलांचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. नव्या रचनेमुळे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी वेगाने होईल. ज्याचा फायदा देशभरातील बँकेच्या ग्राहकांना मिळेल, असा विश्वास शशी जगदीशन यांनी व्यक्त केला.

प्रोजेक्ट फ्युचर रेडी

एचडीएफसी बँक नवीन गुणवत्ता आणि तंत्रज्ञान व डिजिटल या गोष्टींच्या आधारे विकासाच्या नव्या वाटा शोधत आहे. जेणेकरून आगामी काळात उपलब्ध संधींचा पूर्णपणे लाभ उठवता येणे शक्य होईल. या उपक्रमाला प्रोजेक्ट फ्युचर रेडी असे नाव देण्यात आले आहे.
भांडवली बाजाराचे मूल्य पाहता एचडीएफसी ही आजघडीला देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. सध्या देशभरात बँकेचे 1.16 लाख ग्राहक आहेत.

क्रेडिट कार्डात बदल होणार

बँकेची धोरणे आणि रचनात्मक बदलांसह क्रेडिट कार्डांमध्येही मोठे बदल होणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल अशी क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्याचा विचार एचडीएफसी बँक करत आहे. त्यासाठी क्रेडिट कार्ड विभागाचा कारभार फिनटेक या कंपनीकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डाच्या एन्ड टू एन्ड सुरक्षेत वाढ होणार आहे. सध्याच्या घडीला फिनटेक हे ऑनलाईन बँकिंग आणि क्रेडिट कार्डासाठी चांगले व्यासपीठ मानले जाते. त्यामुळेच एचडीएफसी बँकेकडून त्यांच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या:

कोरोना संकटाच्या काळात ‘या’ बँकेकडून बचतीवरील व्याजदरात 2% कपात

गेल्या 65 वर्षांच्या इतिहासात एलआयसीला सर्वाधिक नफा, जाणून घ्या पॉलिसी धारकांना काय होईल फायदा?

कोरोनानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ‘या’ सरकारी योजनेत मिळणार 2 लाख, नॉमिनीनं असा करावा अर्ज

(HDFC bank restructuring focus on 3 key areas)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI