AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MEIL ची स्वदेशी प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत ऑइल ड्रिलिंग रिग्जची निर्मिती, 4 किलोमीटर खोल तेल विहीर काढण्याची क्षमता

मेघा इंजिनीअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ही क्रुड ऑइल जमिनीतून काढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रिगची निर्मिती करणारी भारतातील पहिली खासगी कंपनी आहे. MEIL oil drilling rig

MEIL ची स्वदेशी प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत ऑइल ड्रिलिंग रिग्जची निर्मिती, 4 किलोमीटर खोल तेल विहीर काढण्याची क्षमता
MEIL कंपनीचे ऑईल ड्रिलींग रिग
| Updated on: Apr 07, 2021 | 5:27 PM
Share

मुंबई: प्रगत तंत्रज्ञानाने क्रुड ऑइल जमिनीतून काढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रिगची निर्मिती आणि वापर करणारी खासगी क्षेत्रातील मेघा इंजिनीअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ही भारतातील पहिली कंपनी आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेचा एक भाग म्हणून, एमईआयएलने देशात प्रथमच या रिगची निर्मिती केली आहे. या रिग प्रगत तंत्रज्ञान आणि हायड्रॉलिक सिस्टमसह डिझाइन केलेल्या आहेत. एमईआयएलचे उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी म्हणाले की, आजपासून गुजरातच्या अहमदाबादमधील कलोल ऑईल फील्डमध्ये ड्रिलिंग ऑपरेशन सुरू झाले आहे. 1500 एचपी क्षमतेचे ड्रिलिंग रिग जमिनीच्या पृष्ठभागापासून 4000 मीटर (4 किलोमीटर) खोलीपर्यंत तेल विहीर सहजपणे खोदू शकते. एमईआयएलने बनवलेल्या या रिग 40 वर्षांपर्यंत कार्यक्षम राहू शकतात. (Megha Engineering and  Infrastructures Limited  developed oil drilling rig on Modern Indian Technology.)

पहिली रिग अहमदाबादमध्ये वापरात

2019 मध्ये एमईआयएलला 6000 कोटी रुपयांचे 47 ड्रिलिंग रिग्जचे उत्पादन करण्याचे टेंडर प्राप्त झाले. यातील पहिली रिग अहमदाबादच्या तेलक्षेत्रात वापरली गेली. उर्वरित 46 रिग्स उत्पादनाच्या विविध टप्प्यात आहेत. एकूण रिग्जपैकी 20 ओव्हर रिग्ज असतात. ओव्हर रिग्जचा उपयोग खोदलेल्या विहिरींमधून तेल काढण्यासाठी केला जातो. तसेच यामूळे तेल उत्पादनात वाढ होते आणि तेल विहिरी दुरुस्त करण्यासाठी या सोयीस्कर असतात. सामान्य रिग्जद्वारे  हे काम करता येत नाही.  उर्वरित 27 रिग लँड ड्रिलिंग रिग्ज असतात. लँड ड्रिलिंग रिग्ज एक अत्याधुनिक मशीन आहे. जे भूगर्भाच्या पृष्ठभागापासून भूमिगत तेलाच्या साठ्यापर्यंत पृथ्वीचे थर खोदते. ते साधारण 1500 मीटर ते 6000 मीटरपर्यंत आत जाऊ शकते. साधारण रिग्ज केवळ 1000 मीटर पर्यंत खोदू शकतात.

गुजरातमध्ये सध्या एक रिग पूर्णतः कार्यरत आहे आणि काही दिवसांतच दुसरी रिगदेखील कार्यरत होईल. काही रिंग्ज आंध्र प्रदेशातील राजामुंद्रीच्या तेलक्षेत्रात उपयोगात येतील , तर उर्वरित आसाम, त्रिपुरा आणि तामिळनाडूमधील ओएनजीसी तेल उत्खनन क्षेत्रात उपयोगात आणल्या जातील.

वेगवान यंत्रणा, विजेचा कमी वापर

एमईआयएलचे उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी म्हणाले की, अहमदाबादजवळील दमासाना गावात कलोल तेलविहीर स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून खणली जाते आहे. अगदी कमी विजेचा वापर करुन खूप वेगाने ही यंत्रणा काम करेल. हा रिग प्रगत हायड्रॉलिक आणि स्वयंचलित तंत्रज्ञानासह बनविला गेला आहे. 1500 एचपी क्षमतेची रिग 4000 मीटर खोल पर्यंत सहजतेने खोदू शकते आणि सुरक्षिततेच्या उच्च मानकांची परिपुर्ती या यंत्रणेत आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत निर्मिती

पी. राजेश रेड्डी म्हणाले की, प्रगत स्वदेशी तंत्रज्ञानासह मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत रिग तयार करणे आणि भारताच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक ओएनजीसीला त्याचा पुरवठा करणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे. हा कार्यक्रम देशार्तगत खनिज तेलाच्या उत्पादनात वाढ करेल आणि आयात कमी करून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात बरीच मदत करेल. या प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा ओएनजीसीला नक्कीच होईल.

व्यावसायिक उत्पादन सुरु होणार

भविष्यात या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने MEIL व्यावसायिक उत्पादनही सुरू करणार आहे. एमईआयएलने मेक इन इंडियाचे धोरण अंगी बाळगलंय. पी. राजेश रेड्डी म्हणाले, तेल आणि इंधन काढण्याच्या रिग्जमध्ये MEIL ही भारताची एक आशा बनली आहे, आतापर्यंत आपण यासाठी अन्य देशांच्या यंत्रणेवर अवलंबून होती. MEIL संपूर्ण भारतीय प्रगत तंत्रज्ञानासह रिगची निर्मिती करीत आहे. जी इतर कोणत्याही परदेशी कंपनीच्या रिग्जच्या तोडीस तोड अशीच आहे, याचा केवळ MEIL ला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.

संबंधित बातम्या:

Gold Rate Today: रुपयाच्या कमकुवतपणामुळे सोने वधारले, पटापट तपासा ताजे दर

RBI च्या निर्णयामुळे Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना होणार फायदा, वाचा कसा?

(Megha Engineering and Infrastructures Limited developed oil drilling rig on Modern Indian Technology)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.