Gold Bond | सरकारने पुन्हा सोने खरेदीची सुवर्ण संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करुन दिली आहे. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. आता तर भारतातच बुलियन एक्स्चेंजची (Billion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोप्पं झालं आहे. त्याचबरोबर देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आता सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा दुसरा टप्पा आहे. या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 26 ऑगस्टपर्यंत ही सोने खरेदी करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान पहिली मालिका सुरू केली होती.