AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारनं एअर इंडिया टाटांना विकली, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय? पगार आणि भत्ते किती मिळणार?

सरकारने सांगितले की, सुमारे 12085 कर्मचारी एअर इंडियामध्ये काम करतात. यापैकी 8084 कायम कर्मचारी आणि 4001 कंत्राटी कामगार आहेत. यापैकी 3400 कायम कर्मचारी 2023-24 या आर्थिक वर्षात निवृत्त होतील. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये एकूण 1434 कर्मचारी आहेत. 191 कायम कर्मचारी आहेत. 1156 कंत्राटी कर्मचारी आहेत.

मोदी सरकारनं एअर इंडिया टाटांना विकली, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय? पगार आणि भत्ते किती मिळणार?
Air India
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 5:28 PM
Share

नवी दिल्लीः टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18,000 कोटी रुपयांची बोली जिंकली. 4 ऑक्टोबरला टाटा सन्सची बोली मंजूर झाली असून, मंत्र्यांच्या पॅनलने बोलीला मंजुरी दिलीय. आता मनात येणारा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे काय होणार? त्याची नोकरी कायम राहील की कोणत्या प्रकारचे बदल शक्य आहेत? त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधांचे काय?

एअर इंडियामध्ये सध्या किती कर्मचारी आहेत?

सरकारने सांगितले की, सुमारे 12085 कर्मचारी एअर इंडियामध्ये काम करतात. यापैकी 8084 कायम कर्मचारी आणि 4001 कंत्राटी कामगार आहेत. यापैकी 3400 कायम कर्मचारी 2023-24 या आर्थिक वर्षात निवृत्त होतील. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये एकूण 1434 कर्मचारी आहेत. 191 कायम कर्मचारी आहेत. 1156 कंत्राटी कर्मचारी आहेत.

आता कर्मचाऱ्यांचे काय होणार?

एव्हिएशन सेक्रेटरीने पत्रकार परिषदेत सांगितले की, कोणाचीही नोकरी जाणार नाही. टाटा सन्स सर्व कर्मचाऱ्यांना एक वर्षासाठी कायम ठेवेल. दुसऱ्या वर्षी टाटा सन्स व्हीआरएस देऊ शकते. सचिव म्हणाले की, सर्व भत्ते अखंड राहतील. ग्रॅच्युइटी देखील वेळेवर दिली जाईल.

घर रिकामे करण्यास सांगितले होते

सप्टेंबरच्या अखेरीस विमान मंत्रालयाने एअर इंडियाच्या अध्यक्षांना औपचारिकरित्या एक पत्र पाठवून सांगितले होते की, 15 दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना लेखी हमीपत्र सादर करावे लागेल की ते निवासस्थान शांतपणे रिकामे करीत आहेत. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत एआयएसएएमने निर्णय घेतला होता की, एअर इंडियाचे कर्मचारी कंपनीच्या निवासी वसाहतींमध्ये निर्गुंतवणुकीनंतर सहा महिने राहू शकतात किंवा जोपर्यंत या मालमत्ता विकल्या जात नाहीत, जी तारीख आधी असेल. एअर इंडियाच्या निवासी वसाहतींमध्ये राहणाऱ्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांना तातडीने रिकामे करण्याची नोटीस दिली जाईल. परंतु जे सेवेत आहेत त्यांना निर्गुंतवणुकीनंतर सहा महिने राहण्याची परवानगी दिली जाईल. निर्धारित वेळेत घर रिकामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे पत्रात म्हटले आहे. त्यांच्याकडून दंड म्हणून बाजारभावानुसार दुप्पट भाडे आकारले जाऊ शकते आणि दिल्ली-मुंबईच्या अशा कर्मचाऱ्यांकडून 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान शुल्क देखील घेतले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब

नवविवाहित जोडप्यांसाठी मॅटर्निटी इन्शुरन्स खूप फायदेशीर, जाणून घ्या

Modi government sells Air India to Tatas, what about employee jobs? How much salary and allowances will you get?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.