डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार, कॅश काढताना द्यावी लागणार ‘ही’ माहिती

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना एटीएममधून (ATM) पैसे काढणं आणखी सोपं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार, कॅश काढताना द्यावी लागणार 'ही' माहिती
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 9:26 PM

नवी दिल्ली : अर्थकारणाशी निगडीत एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच 01 डिसेंबरपासून (december) देशात बँकिंगशी संबंधित नियम बदलणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना एटीएममधून (ATM) पैसे काढणं आणखी सोपं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून यासंबंधी काही नियमांमध्ये बदल होऊ शकतात. अधिक माहितीनुसार, बँका 1 डिसेंबरपासून ओटीपी (One time password) च्या आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नवी पद्धत वापरावी लागणार आहे. (money withdrawing from atm rule is changing from 1 december now you have share OTP)

सध्या ही सुविधा फक्त पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सुरू केली आहे. यासंबंधी बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर यासंदर्भात ग्राहकांना मेसेजेसदेखील पाठवले जात आहेत. तर याआधी एसबीआय (SBI ) नेही ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे हा नियम आता सर्व बँका लागू करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

पंजाब नॅशनल बँकेने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबरपासून एटीएममधून दहा हजाराहून काढण्यासाठी ओटीपी देणं आवश्यक असणार आहे. या नियमानुसार, नाईट हावर्स म्हणजेच रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत लागू करण्यात येईल. यावेळी एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना त्यांचा मोबाइल ओटीपी देणं महत्त्वाचं असले.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 1 जानेवारी 2020 पासून एटीएममधून ओटीपी आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममध्ये सकाळी आठ ते सकाळी आठ या दरम्यान दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपी द्यावा लागणार आहे. पण आता ही सुविधा 24 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

सरकारकडून अलर्ट! WhatsApp वर आलेल्या ‘या’ लिंकमुळे होऊ शकते फसवणूक

सलग दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकासदर ‘मायनस’मध्ये; देशात आर्थिक मंदीचे वारे

(money withdrawing from atm rule is changing from 1 december now you have share OTP)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.