AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्त क्रेडिट कार्ड्स म्हणजे चांगला क्रेडिट स्कोअर? आधी हे समजून घ्या !

तुमच्याही पाकिटात वेगवेगळ्या बँकांची Credit Cards आहेत? आणि तुम्हाला वाटतंय की जितकी जास्त Cards, तितका तुमचा क्रेडिट किंवा सिबिल स्कोअर तगडा होणार? थांबा! हा विचार अनेकांच्या मनात असतो, पण यातलं खरं-खोटं तुम्हाला माहिती आहे का? फक्त Cards ची संख्या वाढवून स्कोअर सुधारतो की अजून काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर परिणाम करतात? चला, उलगडूया क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट स्कोअर यांच्या नात्यामागची खरी गोष्ट!

जास्त क्रेडिट कार्ड्स म्हणजे चांगला क्रेडिट स्कोअर? आधी हे समजून घ्या !
क्रेडिट कार्ड
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 3:08 PM
Share

आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येकाकडे एक तरी क्रेडिट कार्ड असणं हे सामान्य झालंय. शॉपिंगपासून ते बिल भरण्यापर्यंत अनेक व्यवहारांसाठी लोक क्रेडिट कार्ड्स वापरतात. काही जणांकडे एकच कार्ड असतं, तर काहींच्या पाकिटात ३-४ किंवा त्याहून अधिक कार्ड्स असतात. आणि इथूनच सुरू होतो एक मोठा गैरसमज की “जितकी जास्त कार्ड्स, तितका चांगला क्रेडिट स्कोअर!”

खरंच जास्त कार्ड्स स्कोअर सुधारतात का?

जास्त क्रेडिट कार्ड्स असणं काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं, पण केवळ त्यांची संख्या पुरेशी नाही. खरं महत्त्वाचं आहे – तुम्ही ती कार्ड्स वापरत कशी आहात, आणि त्यांचं व्यवस्थापन किती शिस्तबद्ध आहे!

जास्त कार्ड्सचे फायदे:

1. क्रेडिट युटिलायझेशन कमी ठेवण्यास मदत: तुमच्याकडे जास्त कार्ड्स असतील आणि प्रत्येकावर कमी वापर करत असाल, तर तुमचं Credit Utilization Ratio कमी राहतं. हा अनुपात जितका कमी, तितका तुमचा स्कोअर सुरक्षित मानला जातो.

2. वेगवेगळ्या ऑफर्सचा फायदा: प्रत्येक कार्ड वेगळ्या ऑफर्स, कॅशबॅक, रिवॉर्ड्स देतं. त्याचा वापर चतुराईने केला, तर आर्थिक लाभ होऊ शकतो.

जास्त कार्ड्सचे तोटे

1. हार्ड इन्क्वायरीचा परिणाम: प्रत्येक नवीन कार्डसाठी अर्ज करताना तुमच्या क्रेडिट प्रोफाइलवर बँक ‘हार्ड चेक’ करते, ज्यामुळे स्कोअर तात्पुरता घसरू शकतो.

2. खात्याचं वय कमी होणे: जास्त नवीन कार्ड्स घेतल्याने तुमच्या क्रेडिट हिशोबाचं सरासरी वय कमी होतं – हेही स्कोअरवर प्रतिकूल परिणाम करू शकतं.

3. पेमेंट विसरण्याचा धोका: प्रत्येक कार्डाला वेगळी ड्यू डेट असते. सगळ्या तारखा लक्षात ठेवणं कठीण आणि चुकल्यास उशीराचं पेमेंट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करतं.

4. खर्च वाढण्याची शक्यता: जास्त कार्ड्स म्हणजे अधिक लिमिट – आणि अनेकदा याचा अर्थ अनावश्यक खर्च, जो कर्जाचं ओझं वाढवू शकतो.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.