एक किलो बटाट्याची किंमत 1,00,000; या देशातील लोक खरेदीसाठी लावतात रांग, काय आहे खास?
Most Expensive Potato : भारतात एक किलो बटाट्याची किंमत 30 रुपयांच्या आसपास आहे. मात्र जगात एक असा देश आहे, तिथे बटाट्याची किंमत 1 लाख रुपये प्रति किलो आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतातील लोक मोठ्या प्रमाणात बटाट्याचे सेवन करताात. बटाटा हा प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध असणारी भाजी आहे. बटाट्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भारतीय बाजारात बटाटा हा 25 रूपये प्रतिकिलो दराने विकला जातो. मात्र जगातील अनेक देशांमध्ये बटाट्याची किंमत खूप जास्त आहे. आशियाई देशांमध्ये दक्षिण कोरियात बटाटे सर्वात महाग दराने विकले जात आहेत. या देशात एक किलो बटाट्यासाठी 380 रुपये खर्च करावे लागत आहेत.
एक किलो बटाट्यासाठी किती रुपये मोजावे लागतात?
जगातील इतर देशांचा विचार केल्यास जपानमध्ये एक किलो बटाट्याची किंमत 255 रुपयांच्या आसपास आहे. तैवानमध्ये 245 रूपये, हाँगकाँगमध्ये 235 रूपये, फिलीपिन्समध्ये 225 रूपये, सिंगापूरमध्ये 215 रूपये, इंडोनेशियामध्ये 140 रूपये, थायलंडमध्ये 135 रूपये, व्हिएतनाममध्ये 90 रूपये, चीनमध्ये 85 रूपये आणि मलेशियामध्ये 80 रूपये आहे.
जगातील सर्वात महागडा बटाटा
जगातील सर्वात महागडा बटाटा हा फ्रान्समध्ये आढळतो, ले बोनोट जातीचा हा बटाटा आहे. या एक किलो बटाट्याची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे. हा बटाटा महाग असूनही लोक तो खरेदी करण्यासाठी रांग लावतात. कारण या बटाट्याचे उत्पन्न खूप कमी आहे. हा बटाटा दरवर्षी मे आणि जूनमध्येच विक्रीसाठी बाजारात येतो. तसेच अटलांटिक महासागरातील लॉयर भागातील नोइरमाउटियर फ्रेंच बेटावर याचे उत्पादन घेतले जाते.
काय आहे खास?
या बटाट्याची चव खूप खास असते, त्यामुळे त्याला खूप मागणी आहे. दरवर्षी या बटाट्याच्या उत्पादनात वाढ किंवा घट होऊ शकते, त्यामुळे किंमतही कमी-जास्त होऊ शकते. या बटाट्याला शेतकरी बेनोइट बोनोट यांच्या नावावरून ले बोनोट असे पडले आहे. कारण या बटाट्याची लागवड करणारे बोनोट हे पहिले शेतकरी होते. या बटाट्याची लागवड पारंपारिक पद्धतीने केली जाते. यासाठी लागणारी मशागत हाताने केली जाते, यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केजा जात नाही. हा बटाटा आकाराने लहान असतो, तसेच त्याची साल खूप पातळ असते. हा बटाटा उकडून तूप आणि मीठ घालून खाल्ला जातो. याच्या अप्रतिम चवीमुळे या बटाट्याला खूप मागणी आहे.
