Mukesh Ambani Security : मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेतील गार्डला किती असतो पगार

Mukesh Ambani Security Salary: Z प्लस सुरक्षा असलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी नॅशनल सिक्योरिटी गार्ड म्हणजेच एनएसजी कमांडो असतात. हे देशातील सर्वात पावरफुल कमांडो आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ते काम करतात. एनएसजी कमांडोची निवड सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ आणि सीआईएसएफ अशा अर्धसैनिक दलातून होते.

Mukesh Ambani Security : मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेतील गार्डला किती असतो पगार
Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 1:58 PM

Mukesh Ambani Security Salary: देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांना Z प्लस सुरक्षा दिली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत एनएसजी कमांडो आणि सीआरपीएफचे जवान असतात. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले गार्ड मुकेश अंबानी यांची सुरक्षा करतात. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत 10 पेक्षा जास्त एनएसजी कमांडो आणि 50 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवान तैनात असतात. तसेच मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी त्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहे. सरकारकडून मुकेश अंबानी यांना ही सुरक्षा मिळाली असली तरी त्याचा खर्च ते स्वत: उचलतात. सुरक्षेचा खर्च ते सरकारकडे जमा करत असतात. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत असणाऱ्या कमांडोना पगार किती असणार…

असा आहे कमांडोचा पगार

मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत असणाऱ्या कमांडोचा पगार पदानुसार ठरलेला असतो. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत दहा पेक्षा जास्त एनएसजी कमांडो आहेत. या एनएसजी कमांडोमधील ग्रुप कमांडरला महिन्याला 1,00,000 ते 1,25,000 रुपये वेतन मिळते. तसेच स्क्वॉड्रन कमांडरला 90,000 ते 1,00,000 रुपये मिळतात. टीम कमांडरला 80 हजार ते 90 हजार रुपये मिळतात.

मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत 50 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवान असतात. त्यांचा पगारही पदानुसार वेगवेगळा असतो. तसेच महाराष्ट्रात असताना मुंबई पोलीस किंवा इतर राज्यात गेल्यावर त्या राज्यातील पोलिसांची सुरक्षाही त्यांना असते.

हे सुद्धा वाचा

अशी होते एनएसजीची निवड

Z प्लस सुरक्षा असलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी नॅशनल सिक्योरिटी गार्ड म्हणजेच एनएसजी कमांडो असतात. हे देशातील सर्वात पावरफुल कमांडो आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ते काम करतात. एनएसजी कमांडोची निवड सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ आणि सीआईएसएफ अशा अर्धसैनिक दलातून होते. त्यांना 90 दिवसांची कठोर ट्रेनिंग असते. नॅशनल सिक्योरिटी गार्डची निर्मिती 16 ऑक्टोंबर 1984 रोजी करण्यात आली आहे. एनएसजी कमांडो जर्मनीच्या GSG9 पातळीवर करण्यात आली. 26/11 मुंबई हल्ल्यात एनएसजी कमांडोची भूमिका महत्वाची राहिली होती.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.