AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदी आणि तणाव फ्री राहण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा ‘हे’ 5 बद्दल

ऑफिसची कामे पूर्ण करणे आणि वैयक्तिक नातेसंबंध सांभाळणे यामुळे कधीकधी तणावाची पातळी इतकी वाढू शकते की ती असह्य वाटू शकते. गोष्टी खूपच जास्त वाटू लागतात. अशा परिस्थितीत, तुमच्या धावपळीच्या जीवनात काही साधे बदल केल्यास तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होईल. चला या 5 बदलाबद्दल जाणून घेऊयात.

आनंदी आणि तणाव फ्री राहण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा 'हे' 5 बद्दल
life style
| Edited By: | Updated on: May 19, 2026 | 4:43 PM
Share

आजकाल कामाच्या ठिकाणी डेडलाईन कंप्लीट करण्यापासून ते प्रोडक्टिविटीपर्यंत एवढ्या स्पर्धा वाढल्या आहेत की वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात संतुलन राखणे कठीण होते. यामुळे आपल्यापैकी अनेकांचा तणाव अनेक पटींनी वाढतो. अनेकदा तुम्हाला थकवा, चिंता आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवतात. आतून अधिक आनंदी राहण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही जीवनशैलीत काही साधे बदल केले पाहिजेत.

जीवनशैलीतील छोटे बदलही मोठा फरक घडवू शकतात. चांगल्या सवयींमुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हळूहळू सुधारते. या लेखात तणाव कमी करण्यास आणि तुम्हाला अधिक आनंदी वाटण्यास मदत करणाऱ्या सवयींबद्दल जाणून घेऊयात.

फोनपासून दूर ठेवा, श्वासावर लक्ष केंद्रित करा

तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर तुमच्या फोनमधील नोटिफिकेशन्स पाहतात, तर या सवयीमुळे तुमचा ताण वाढतो. तुम्ही ही सवय मोडून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सकाळी उठल्यावर 1-2 मिनिटे हळूहळू श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. या सवयीमुळे तुमचा ताण कमी होतो आणि शरीरातील सुस्तीही दूर होते.

दररोज ध्यान करा

तुमचा जर दिवस तणावपूर्ण असेल किंवा तुम्हाला विविध गोष्टींमुळे वारंवार तणाव जाणवत असेल, तर तुम्ही दररोज काही मिनिटे ध्यान केले पाहिजे. सुरुवातीला फक्त पाच मिनिटे शांततेत सुरुवात करा. डोळे बंद करा, ताठ बसा आणि हळू श्वास घ्या. या प्रक्रियेमुळे तुमचे मन शांत होण्यास आणि मनातील गोंधळ कमी होण्यास मदत होईल. काही दिवसांच्या सवयीनंतर ध्यानामध्ये चेंज करा.

सोप्या पद्धतीने खाण्याची सवय करा

अन्नपदार्थ केवळ तुमचे पोटच भरत नाही, तर ते तुमच्या शरीरासाठी औषधासारखेही काम करते. सोप्या पद्धतीने जेवण्याची सवय करणे महत्त्वाचे आहे. पौष्टिक आणि समाधान देणारे पदार्थ खा. जेवताना स्क्रीनपासून दूर राहा आणि प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या.

पर्सनल टाईमला ऑप्शनल बनवू नका

दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ बाजूला काढा. हा वेळ ऑप्शनल ठेवू नका; उलट तो फक्त तुमचाच असेल याची खात्री करा. या वेळेत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता, जसे की स्वतःची काळजी घेणे किंवा स्वतःला काहीतरी भेटवस्तू देणे.

कृतज्ञतेने दिवसाचा शेवट करा

आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करावी आणि दिवसाचा शेवटही कृतज्ञतेनेच करावा. दिवसभरात तुमच्यासोबत घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. तुमच्या लक्षात येईल की यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मकता येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?