बांगलादेशमधील परिस्थितीचा फायदा मुकेश अंबानी यांच्या कंपनीला, शेअर बाजारात खरेदीसाठी लूट
Mukesh Ambani Stock: आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये मुकेश अंबानी यांचा मोठा वाटा आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीपर्यंत रिलायंस इंडस्ट्रीजजवळ आलोक इंडस्ट्रीजचे 40.01 पर्सेंट हिस्सेदारी आहे. तसेच जेएम फाइनेंशियल रिकंस्ट्रक्शनजवळ 34.99 पर्सेंट हिस्सेदारी आहे.

Bangladesh Violence : बांगलादेश सध्या गंभीर संकटातून जात आहे. बांगलादेशात निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाली आहे. यामुळे त्या देशातील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे. या परिस्थितीनंतर देशातील वस्त्रोउद्योगाचे चांगभले होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात टेक्सटाईल कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगलीच वाढ दिसत आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड (Alok Industries Ltd share) चे शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची चढाओढ लागली आहे. यामुळे मंगळवारी अलोक इंडस्ट्रीजचे शेअर 6% वधारले होते. त्यानंतर बुधवारीसुद्धा या कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ दिसत आहे.
बांगलादेशातील परिस्थितामुळे का वाढत आहे शेअर
बांगलादेशातील परिस्थितीमुळे सर्वात मोठा फटका तेथील टेक्सटाईल उद्योगाला पडणार आहे. बांगलादेशातील अर्थव्यवस्थेत तेथील टेक्सटाईल उद्योगाचा मोठा वाटा आहे. त्या ठिकाणी तयार होणारे कपडे भारतासह जगभरात निर्यात होतात. परंतु आता बांगलादेशातील अस्थिरतेमुळे जगभरातील कपड्यांचे खरेदीदार भारताकडे वळणार आहे. त्याचा फायदा मुकेश अंबानी यांच्या आलोक इंडिस्ट्रीजला होणार आहे.
वर्षभरात 70% वाढला शेअर
आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर मागील वर्षभरात 70% टक्के वाढला आहे. वर्षभरातील म्हणजेच 52 आठवड्यातील या शेअरचा उच्चांक 39.24 रुपये आहे. तसेच 52 आठवड्यातील नीचांक 15.15 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटल 12,571.99 कोटी आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये मुकेश अंबानी यांचा मोठा वाटा आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीपर्यंत रिलायंस इंडस्ट्रीजजवळ आलोक इंडस्ट्रीजचे 40.01 पर्सेंट हिस्सेदारी आहे. तसेच जेएम फाइनेंशियल रिकंस्ट्रक्शनजवळ 34.99 पर्सेंट हिस्सेदारी आहे. रिलायंस इंडस्ट्रीजने जेएम फाइनेंशियल एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडून दिवाळखोरीत जाणाऱ्या या कंपनीचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर कंपनीचा शेअर वाढत आहे.
भारत-बांगलादेशचा व्यापार कसा?
बांगलादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताचा शेजारील हा देश आशियातील दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताची बांगलादेशातील निर्यात 2022-23 या आर्थिक वर्षातील US $ 12.21 बिलियनवरून 2023-24 मध्ये $ 11 बिलियनवर घसरली. भारताच्या मुख्य निर्यातीत भाज्या, कॉफी, चहा, मसाले, साखर, शुद्ध पेट्रोलियम तेल, रसायने, कापूस, लोखंड आणि पोलाद आणि वाहने इत्यादींचा समावेश होतो. मुख्य आयात केलेल्या वस्तूंमध्ये मासे, प्लास्टिक, चामडे आणि कपडे आहेत.
