मुकेश अंबानी यांची बहीण आहे या प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी, इतक्या कोटींची आहे संपत्ती
मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट यांच्यासोबत १२ जुलै रोजी होणार आहे. यासाठी अनेक मोठ्या मंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे. या विवाहसोहळ्याला मुकेश अंबानी यांची बहीण देखील उपस्थित आहे. कोण आहे त्या जाणून घ्या.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी विवाह होणार आहे. सोमवारी रात्री अँटिलियामध्ये हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात अंबानी कुटुंबातील सदस्य तर होतेच पण अनेक सेलिब्रिटी ही सहभागी झाले होते. मुकेश अंबानी यांची धाकटी बहीण दीप्ती साळगावकरही या समारंभात पोहोचल्या होत्या. देशातील सर्वात महत्त्वाची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे पुत्र मुकेश आणि अनिल अंबानी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्या दोन बहिणी दीप्ती आणि नीना यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहितीये. कारण या दोन्ही बहिणी नेहमी प्रसिद्धीपासून लांब राहतात.
दीप्ती साळगावकर कोण आहेत
दीप्ती साळगावकर या अंबानी भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1962 रोजी झालाय. त्यांचा विवाह गोव्यातील व्यापारी दत्तराज साळगावकर यांच्याशी झाला आहे. दीप्ती यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कारण त्या प्रसिद्धीपासून दूर राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची संपत्ती सुमारे एक अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांचे पती दतराज साळगावकर हे गोव्यातील प्रसिद्ध व्यापारी आहेत. व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते मालक आणि एमडी आहेत. गोव्यातील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब साळगावकरचेही ते मालक आहेत. गोव्याची संस्कृती वाचवण्यासाठी दत्तराज यांनी सुनापरंताची स्थापना केली आहे. दीप्ती साळगावकर या संस्थेच्या उपाध्यक्षा व सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.
मुलगी एक व्यावसायिक महिला
दीप्ती आणि दत्तराज साळगावकर यांची मुलगी इशिता साळगावकर ही देखील एक व्यावसायिक महिला आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी पदवी घेतलीये. साळगावकर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटच्या त्या उपाध्यक्ष आहेत. इशिता यांनी यापूर्वी नीरव मोदीचा धाकटा भाऊ नीशल मोदीसोबत २०१६ मध्ये लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर इशिताने 2022 मध्ये नेक्सजू मोबिलिटीचे संस्थापक अतुल्य मित्तल यांच्यासोबत लग्न केले. अतुल्य हा लक्ष्मी निवास मित्तल यांचा पुतण्या असून ते एक यशस्वी व्यापारी आहेत.
