अजून किती परतावा हवा, हा शेअर धावला सूसाट, महिनाभरातच डबल केला पैसा

Multibagger penny stock : शेअर बाजारात चढउताराच्या सत्राने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. बाजार रेकॉर्ड केल्यानंतर दणकावून खाली येत आहे. पण अशा परिस्थितीतही या स्टॉकने मोठा भीम पराक्रम केला आहे. गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

अजून किती परतावा हवा, हा शेअर धावला सूसाट, महिनाभरातच डबल केला पैसा
मल्टिबॅगर स्टॉकचा जलवा, महिनाभरातच दुप्पट पैसा
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 3:39 PM

शेअर बाजार केव्हा कोणते वळण घेईल आणि काय पदरात टाकेल, याचा अंदाज बांधणे कठिण झाले आहे. अनेक नवीन रेकॉर्ड बाजाराने नावावर नोंदवले आहे. पण गुंतवणूकदारांचा खिसा पण कापला आहे. अशा परिस्थितीत हा पेनी स्टॉक बलभीम ठरला आहे. त्याने बाजारातील चढउताराला धोबीपछाड दिली आहे. महिनाभरातच या स्टॉकने गुंतवणूकदारांना दुप्पट परताव दिला आहे. गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे झाले आहे.

एका महिन्यातच सूसाट

केवळ एका महिन्यातच या शेअरने सर्वांचे अंदाज साफ चुकवत मोठा पराक्रम गाजवला. एक महिन्यापूर्वी हा शेअर 9.20 रुपयांना होता. आज तो 18.90 रुपयांना झाला आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. या शेअरने अवघ्या महिन्याभरातच गुंतवणूकदारांना 105 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. एक लाख गुंतवणूकदारांना झटपट 2.05 लाखांचा परतावा मिळाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागले आहे. या स्टॉकने या कालावधीत 20 टक्के परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

एका वर्षात दमदार रिटर्न

एका वर्षात या शेअरने 464 टक्क्यांचा परतावा देत मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत स्थान पटकावले आहे. एका वर्षापूर्वी रतन इंडियाचा शेअर 3.35 रुपयांना होता. त्यावेळी ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्या गुंतवणुकीचे मू्ल्य आता 5.65 लाख रुपये झाले आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 19.15 रुपये आजच झाला. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 3.15 रुपये आहे.

परदेशी गुंतवणूकदार झाले फिदा

मार्च तिमाहीपर्यंत या कंपनीत प्रमोटर्सचा वाटा 44.06 टक्के इतका होता. या शेअरवर परदेशी गुंतवणूकदार पण फिदा आहेत. डिसेंबर तिमाहीत या कंपनीतील परदेशी पाहुण्यांचा वाटा 0.76 टक्क्यांवरुन 2.04 टक्क्यांवर पोहचला आहे. तर घरगुती संस्थागत गुंतवणूकदारांनी त्यांचा वाटा 0.09 टक्क्यांहून 0.11 टक्के इतका वाढवला आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान म्युच्युअल फंडचे आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.