मुंबईत महागाईचा भडका, पेट्रोलची वाटचाल शतकाकडे; वाचा आजचे दर

आज मुंबईतही महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. आज मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे.

मुंबई : राज्यात गेल्या दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात आज मुंबईतही महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. आज मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे. त्यामुळे ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.34 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 88.44 पैसे इतका आहे. (Mumbai Inflation rises petrol prices hike todays here is latest update)

खरंतर, मागच्या दोन दिवसांपासून हाच दर स्थिर आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणी सापडलेले असताना आता वाढत्या इंधनाच्या दरामुळे आणखी पैशांची चणचण भासणार आहे. आज पॉवर पेट्रोल 100.11 पैसे इतकं झालं आहे. पेट्रोल परवडत नाहीये, सरकारने तोडगा काढावा. सुट द्यावी अशी अपेक्षा आता मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today 25 February) सातत्याने वाढ होत आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढ झाली. दररोज 30 पैशांपर्यंत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण बुधवारी आणि आज गुरुवारीही दरांमध्ये फारसे बदल झालेले दिसले नाहीत.

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीही 35 पैशांनी वाढल्या. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर गुरुवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर

राज्यातील पेट्रोलचे दर मुंबई – 97.34 ठाणे – 96.86 पुणे – 97.47 नागपूर – 97.84 सांगली – 97.26 सातारा – 97.81 औरंगाबाद – 97.93

राज्यातील डिझलचे दर मुंबई – 88.44 ठाणे – 86.61 पुणे – 87.21 नागपूर – 88.99 सांगली – 87.04 सातारा – 87.57 औरंगाबाद – 87.89

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर (Mumbai Inflation rises petrol prices hike todays here is latest update)

संबंधित बातम्या –

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर

30 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचार्‍यांना शासन देणार 120000 रुपये; नेमकं सत्य काय?

पगार वाढ पण हातात कमी येणार? केंद्राच्या नव्या PF नियमानं गोची निश्चित!

ATM चा पिन जनरेट करण्यासाठी आता नवी पद्धत, घर बसल्या बँकेची खास सुविधा

(Mumbai Inflation rises petrol prices hike todays here is latest update)

Published On - 8:22 am, Thu, 25 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI