हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी कसा फायदा? जाणून घ्या

हॉलमार्किंग नेमकं काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो? याची आपण माहिती घेणार आहोत. (Must know these things about Hallmarking Gold jewellery)

हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी कसा फायदा? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 7:43 AM

मुंबई : भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. सोने खरेदीवेळी अनेकांची गुणवत्तेत फसवणूकही केली जाते. त्यामुळे शुद्ध सोने कसं ओळखायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. सोन्याच्या खरेदीत ग्राहकांसोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने अनेक नियम बनविले आहेत. विशेष म्हणजे सरकार वेळोवेळी त्यामध्ये बदलही करत असते. (Must know these things about Mandatory Hallmarking Before Buying Gold jewellery)

नुकत्याच झालेल्या बदलांनुसार येत्या 16 जूनपासून कोणीही हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करु शकत नाही. मात्र हॉलमार्किंग नेमकं काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो? याची आपण माहिती घेणार आहोत.

हॉलमार्क म्हणजे काय?

सोन्यासाठी हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसद्वारे याची निश्चितता केली जाते. हे सोन्याच्या गुणवत्तेची पातळी तपासते. तसेच दागिने किंवा सोन्याच्या नाण्याच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळांना परवाना दिला जातो. सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग असणे आवश्यक असते. त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही याची निश्चित चाचपणी करा.

हॉलमार्क कसा ओळखालं? 

सोन्याच्या हॉलमार्कमध्ये बीआयएसचे त्रिकोणी चिन्ह असते. तसेच, त्यावर हॉलमार्किंग केंद्राची एक खूण असते. त्यासोबतच सोन्याची शुद्धता, तो सोन्याचा दागिना कधी बनवला आहे, हे देखील त्यावर लिहिलेले असते.

सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यावर केली जाते. हॉलमार्किंगमध्ये चार गोष्टींचा समावेश आहे. ज्यामध्ये बीआयएसचा मार्क, शुद्धता सारखे 22 कॅरेट आणि 916, असेसिंग सेंटरची ओळख आणि सराफांच्या ओळखीचे चिन्ह याचा समावेश असणार आहे.

दागिन्यांवर शुद्धतेचे प्रमाणपत्र

प्रत्येक दागिने किंवा नाण्यावर त्याची शुद्धता लिहिलेली असते. 99 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले आहे. तर 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 आणि 21 कॅरेट सोन्याचे 875 असे लिहिलेले असते. या व्यतिरिक्त 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 आणि 14 कॅरेट दागिन्यांवर 585 असे लिहिलेले असते.

हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा

जर एखाद्या व्यापाऱ्याने हॉलमार्कऐवजी स्वस्त दागिने देण्याची ऑफर दिली असेल तर ती ऑफर स्विकारु नका. तज्ञांच्या मते, प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्क करण्याची किंमत केवळ 35 रुपये असते. म्हणजेच, हॉलमार्क केलेले आणि नॉन-हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या किंमतीत सहसा कोणताही फरक नसतो. पण हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत गडबड असू शकते.

कोणतेही दागिने घेताना त्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आवर्जून घ्या. त्यात सोन्याची गुणवत्ता लिहिली आहे की नाही हे तपासा. तसेच त्या दागिन्यांमध्ये काही रत्ने जोडलेले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक घ्या.

हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करण्याचे बरेच फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे सोन्याच्या शुद्धतेसह अडथळा येण्याची शक्यता कमी असते. तसेच जर तुम्ही दागदागिने विकायला गेलात तर त्यामध्ये कोणतेही डेप्रिसिएशन कॉस्ट कमी केली जात नाही. म्हणजेच तुम्हाला सोन्याची योग्य किंमत मिळेल. (Must know these things about Mandatory Hallmarking Before Buying Gold jewellery)

संबंधित बातम्या : 

‘पीएफ’चे नवीन नियम माहीत आहेत काय?; पटापट वाचा, नाही तर मोठा आर्थिक फटका बसणार!

मे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.