AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

60 वर्षापर्यंत सहज जमा होतील 52 लाख रुपये? जाणून घ्या नेमकी योजना काय?

कोरोनाच्या स्थितीत एका रात्रीत कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भविष्यात सुरक्षित उत्तपन्नाच्या दृष्टीने एखादी दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे. (Best investment plan for retirement)

60 वर्षापर्यंत सहज जमा होतील 52 लाख रुपये? जाणून घ्या नेमकी योजना काय?
दरवर्षी मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल सर्वकाही
| Updated on: May 18, 2021 | 1:32 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनामुळे प्रत्येकाच्या जीवनावर काही ना काही परिणाम जाणवत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीची जुन्या पद्धतींचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. कोरोनाच्या स्थितीत एका रात्रीत कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भविष्यात सुरक्षित उत्तपन्नाच्या दृष्टीने एखादी दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे. वेळेनुसार गुंतवणूक करणे हेच योग्य ठरते, असा सल्ला अनेक तज्ज्ञही देतात. (Mutual fund or SIP Best investment plan for retirement)

सध्या बाजारात असे अनेक फंड आहे जे गेल्या काही वर्षांपासून लोकांना चांगल्या उत्पन्न देत होते. मात्र आता त्यात काहीही फायदा राहिलेला नाही. त्यामुळे तुम्ही अशा गुंतवणुकीच्या फंडमधून बाहेर पडणे योग्य ठरते. यातील एक गुंतवणुकीचा फंड म्हणजे एल एंड टी मिडकॅप. हा फंड फार काळ बाजारात टिकू शकला नाही. त्यामुळे यातील तज्ज्ञ मंडळी यातून बाहेर पडावं, अशी शिफारस करत आहेत. त्याशिवाय कोटक स्टँडर्ड मिडकॅप या देखील फंडने गुंतवणूकदारांची निराशा केली होती.

ज्यात फायदा नाही, तो फंड सोडून द्या

सध्या बाजारात असे अनेक गुंतवणुकीचे फंड आहेत, ज्यांनी गेल्या वर्षभरात चांगली कमाई केली आहे. पण आता मात्र यात काहीही फायदा मिळत नाही. अशाच प्रकारचे एक उदाहरण द्यायचे झाले तर अॅक्सिस ब्लू चिप… हा फंड गेल्यावर्षी चांगली गुंतवणूक करत होता. मात्र यंदा यात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. त्यामुळे यातून बाहेर पडावं, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत.

पोर्टफोलिओ तज्ज्ञ फिरोज अझीझ यांच्यामते, कोणत्याही फंडातून बाहेर पडण्यापूर्वी त्याची कामगिरी तपासणे अधिक महत्वाचे आहे. जर एखादा फंड गेल्यावर्षी ठीक होता तर यावर्षी त्याची शक्यता काय असू शकते, हे जाणून घेणं गरजेचे आहे. अनेक गुंतवणूकदार कोणत्या फंड हाऊसमध्ये कोणते फंड आहे, त्याचा फायदा होतो की नाही, हे पाहून तो सोडण्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात.

कोणता फंड योग्य आणि अयोग्य

कोणता फंड योग्य आहे आणि कोणता नाही याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. या आधारे तुम्ही नवीन फंड खरेदी करु शकता. यासाठी त्या फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये पूर्वी काही बदल झाले आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे. या फंडात काही नवी स्टॉक जोडले आहेत की नाही, हे जाणून घ्या. अॅक्सिस ब्लूचिप फंडात जरी घसरण झाली असली तरी त्यांनी 8 ते 9 नवे स्टॉक जोडले होते. यामुळे त्याचे फंड व्यवस्थापक त्यांचे पोर्टफोलिओ कायम बदलत आहेत, असे दाखवतात. यामुळे गुंतवणूकदारांना घाबरून जाण्याची गरज नाही.

कोणत्या दोन मुख्य मुद्द्यांविषयी बोलताना जे फंड चांगले काम करत नाहीत किंवा चांगले रिटर्न्स देत नाहीत, त्यांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे. जर त्यातून तुम्हाला योग्य तो फायदा मिळत नसेल तर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. तसेच चांगले काम करणाऱ्या फंडांमध्ये काही नवीन बदल झाले आहेत की नाही हे पाहण्याची गरज आहे. जर तेथे बदल केले गेले असतील तरच त्यात गुंतवणूक करण्यात काहीच हरकत नाही.

निवृत्तीनंतर काय करायचे?

त्याचप्रमाणे जेव्हा गुंतवणूकीचा प्रश्न समोर येतो, तेव्हा सर्वात आधी तुमच्या डोक्यात निवृत्तीनंतरचा (retirement fund) प्रश्न उभा राहतो. सेवानिवृत्तीनंतर हातात चांगले पैसे येण्यासाठी काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी निवृत्तीनंतर पीपीएफ, एनपीएफ किंवा म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणूकीवर विचार केला जातो. पण त्यांच्यामध्ये कोण सर्वोत्कृष्ट, कोणती गुंतवणूक सर्वात स्वस्त? याचा विचार केला जातो.

खर्च आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एनपीएस हे सर्वोत्तम साधन आहे. हे सर्वात स्वस्त असून ज्याद्वारे तुम्हाला equity मिळू शकते. यात तुम्हाला पीपीएफ आणि ईपीएफमध्ये मिळणारे व्याजदर पाहायला मिळतात. यात शक्यतो काहीही बदल होत नाही. या दोन्हीमध्ये सरकारी रक्कमेपेक्षा जास्त व्याज दर मिळतो.

म्युच्युअल फंड

सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करायचा असल्यास तुम्हाला सर्वप्रथम एखाद्या सेवानिवृत्तीसाठी आवश्यक असलेल्या रक्कमेची माहिती असावी. तसेच तुमच्या निवृत्तीला किती वर्ष बाकी आहेत याचीही देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर तुम्ही दहा हजार रुपयांच्या मासिक एसआयपीवर दर वर्षाला 14 टक्के व्याज मिळतो, असे गृहीत धरल्यास वयाच्या 60 वर्षापर्यंत आरामात 52 लाख रुपये जमा होतील.

त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचादेखील विचार केला पाहिजे. यात बरेच फायदे देते. विशेष म्हणजे तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा यातून पैसे काढू शकता. (Mutual fund or SIP Best investment plan for retirement)

संबंधित बातम्या : 

Income Tax: गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी पाळा आणि 40 हजारापर्यंत टॅक्स वाचवा

गोल्ड एक्सचेंज म्हणजे काय?, भारतात कधी उघडणार अन् त्याचा फायदा काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.