चिनी सायबर हल्ला? अमेरिकी शेअर बाजारात टेक्निकल लोचा; वॉरेन बफे यांच्यासह 40 कंपनीचे शेअर 99% कोसळले!
बफे यांच्या कंपनीचे शेअर तब्बल 99% घसरले आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणामुळे ही घसरण झाली आहे. यामुळे या शेअरची ट्रेडींग थांबवण्यात आली आहे. बफे यांच्याकडे या कंपनीचे 38% शेअर आहे.

अमेरिकन शेअर बाजारात भूकंप झाला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे इंक कंपनीचे शेअरमध्ये त्सुनामी आली आहे. तीन जून रोजी बफे यांच्या कंपनीचे शेअर तब्बल 99% घसरले आहे. एकूण 40 कंपनीचे शेअर घसरले आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणामुळे ही घसरण झाली आहे. यामुळे या शेअरची ट्रेडींग थांबवण्यात आली आहे. बफे यांच्याकडे या कंपनीचे 38% शेअर आहे. हा चीनी सायबर हल्ला आहे की काय? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
का झाली 99.97% घसरण
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की, अमेरिकेतील काही प्रमुख समभागांसाठी ट्रेडिंग थांबवली आहे. तसेच बर्कशायर हॅथवे शेअरमध्ये 99.97% घसरण झाल्यानंतर याबाबत निर्माण झालेली तांत्रिक समस्या सोडवली गेली आहे. आता हे स्टॉक पुन्हा उघडले आहेत. आता सर्व सिस्टम कार्यरत आहे. तसेच सायबर हल्ल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे संकेत अद्याप मिळाले नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले.
40 शेअरची ट्रेडींग थांबवली
NYSE प्रवक्त्याने सांगितले की, शेअर बाजारात एक तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे NYSE ग्रुप एक्सचेंजेसवर सूचीबद्ध केलेल्या 40 शेअरची ट्रेडींग थांबवण्यात आली. ही समस्या सॉफ्टवेअर संबंधित असण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे चिपोटल आणि बर्कशायर हॅथवे यांच्या कंपन्यांचा समावेश आहे. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी चालवलेल्या होल्डिंग कंपनी यामध्ये आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनच्या प्रवक्त्याने सीएनएनला सांगितले की, “आम्ही या समस्येचे निरीक्षण करत आहोत आणि बाजारातील ट्रेडींग सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहोत. थेमिस ट्रेडिंगचे सह-संस्थापक जो सलुझी यांनी सीएनएनशी बोलताना या प्रकारबद्दल चिंता व्यक्त केली.
