AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोने-चांदीचा दरवाढीचा मुहूर्त! आज इतकी झाली भाववाढ

Gold Silver Price Today : सोने-चांदीत सध्या तेजी दिसून येत आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदर वाढविल्यानंतर जागतिक बाजारात सोने-चांदीचा भाव वधारला आहे. त्यामुळे देशातंर्गत मौल्यवान धातूच्या किंमतीत चढउतार झाला.

Gold Silver Price Today : सोने-चांदीचा दरवाढीचा मुहूर्त! आज इतकी झाली भाववाढ
आजचा भाव काय
| Updated on: May 09, 2023 | 9:21 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउतार सुरु आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून किंमतीत मोठा बदल झाला नव्हता. देशातील अनेक शहरात सोने-चांदीने (Gold Silver Price) कर आणि इतर शुल्कासहित 63,000 हजारांचा टप्पा गाठला होता. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी आणि 5 एप्रिल 2023 रोजी सोने-चांदीने दरवाढीचा विक्रम नावावर केला आहे. आता सोने 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. तर चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत भावात पुन्हा चढउतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी भावासंबंधीची अपडेट घेऊन खरेदी करावी.

असा झाला बदल गुडरिटर्न्सनुसार, 5 मे रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,350 रुपये, तर 24 कॅरेटचा भाव प्रति 10 ग्रॅम 62,550 रुपये होता. 6 मे रोजी भावात जोरदार घसरण झाली. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,650 रुपये, तर 24 कॅरेटचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,790 रुपये होता. 9 मे रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,900 रुपये आहे.

चांदीत दरवाढ 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर आज 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता.

गेल्या 6 वर्षांत इतकी घसरण सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022—23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?