Business : 10,000 रुपयांत व्हा सरकारचे बिझनेस पार्टनर..एफडी पेक्षा मिळवा जास्त रिटर्न..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 28, 2022 | 3:41 PM

Business : सरकारच्या या व्यवसायात केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करेल..

Business : 10,000 रुपयांत व्हा सरकारचे बिझनेस पार्टनर..एफडी पेक्षा मिळवा जास्त रिटर्न..
सरकारच्या व्यवसायात व्हा भागीदार
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : आता तुम्ही म्हणाल सरकारच्या (Government) अनेक योजना (Policy) आहेत. त्यात गुंतवणूक तर सुरु आहे. पण त्यात कधी पार्टनर होता आले नाही. आता ही कोणती गुंतवणूक आहे. ज्यात सरकारचे पार्टनर (Partnership) होता येईल? या व्यवसायात गुंतवणूक केल्यास सरकारच्या इतर योजनांपेक्षा तुम्हाला हमखास जास्त परतावा (Return) मिळणार आहे.

देशाला मजबूत रस्त्यांच्या जाळ्यांनी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाव आज सर्वांनाच माहिती आहे. तर वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे हे खाते सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.

प्राधिकरणाच्या InvIT NCDs चे शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) सुचीत समावेश झाला. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता यामध्ये गुंतवणूक करुन थेट देशाच्या विकासात सहभागी होता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

या शेअरमध्ये 25 टक्के गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यावेळी उपस्थित होते. त्यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या इनविट एनसीडीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून बँकेपेक्षा अधिकचा फायदा होणार आहे. बँकेतील एफडीपेक्षाही यामध्ये जास्त परतावा मिळेल. यामध्ये 8.05 टक्के परतावा मिळतो.

मंत्री गडकरी यांनी किरकोळ गुंतवणूकदार, सेवानिवृत्त नागरीक, वेतनधारक, छोटे आणि मध्यम व्यापारी तसेच इतर गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करुन राष्ट्राच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्राधिकरणाच्या InvIT NCDs बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल. त्यासाठी 10,000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्याआधारे तुम्ही या व्यवसायाचे भागीदार व्हाल.

InvIT NCDs मध्ये तुम्हाला इतर इक्विटी फंडासारखीच गुंतवणूक करता येईल. याची ट्रेडिंग बीएसईवर करता येईल. पण हा इक्विटी फंडपेक्षा नक्कीच वेगळा असल्याची आशा गडकरी यांनी व्यक्त केली आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI