भारतात येण्याचा तर प्रश्नच नाही, मी इंग्लंडमध्येच राहणार, नीरव मोदीला कशामुळे इतका आत्मविश्वास

Nirav Modi Extradition | भारतातून पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या भारतात येण्याची शक्यता कमी आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पुन्हा एकदा रेंगाळण्याची शक्यता आहे. नीरव मोदीने पण तो अनेक वर्षे इंग्लंडमध्येच राहील असा दावा केला आहे. त्यामागे त्याने जे कारण दिले, त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार आहे.

भारतात येण्याचा तर प्रश्नच नाही, मी इंग्लंडमध्येच राहणार, नीरव मोदीला कशामुळे इतका आत्मविश्वास
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 1:23 PM

नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : बँकेची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात मोस्ट वॉन्टेड असलेला पळपुटा नीरव मोदी भारतात येण्याची शक्यता धूसर झाली आहे. हीरे व्यापारी मोदीने ब्रिटेनच्या एका कोर्टात माहिती सादर केली. त्यानुसार, तो अनेक वर्षे इंग्लंडमध्ये राहू शकतो. काही कायदेशीर कारवाईत त्याचे भारताकडील प्रत्यार्पण टळेल. नीरव मोदीला टेम्साईड तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फ्ररन्सने कोर्टासमोर हजर करण्यात आले. काल पूर्व लंडनमधील बार्किंगसाईड मॅजिस्ट्रेटसमोर ही सुनावणी झाली. प्रत्यार्पण अपील प्रकरणात त्याला 1,50,247 पौंड दंड भरण्यासंदर्भात ही सुनावणी होती.

माझ्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत- नीरव मोदी

52 वर्षांचा नीरव मोदीने तीन सदस्यीय न्यायाधीशांच्या पीठासमोर त्याची बाजू मांडली. त्यानुसार, गेल्या वेळी न्यायालायने त्याला दरमहा 10,000 पौंड भरण्याचा जो आदेश दिला होता, त्याचे पालन केल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी त्याने तुरुंगातच राहण्याचे कारण स्पष्ट केले. सध्या मी तुरुंगात आहे. माझ्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही. भारतात प्रत्यार्पण प्रक्रियेतंर्गत न जाण्यासाठीच आपण तुरुंगात असल्याचा दावा त्याने यावेळी केला.

हे सुद्धा वाचा

इंग्लंडमध्येच दीर्घकालीन वास्तव्य

प्रत्यार्पण प्रक्रियेविषयी माहिती होते का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. आपल्याला याविषयी काहीच माहिती नव्हते. मार्च महिन्याच्या मध्यात पोलिसांनी अचानक अटक केली. काही कार्यवाही अद्याप सुरु आहे. या कायदेशीर प्रक्रियेमुळेच आपण अनेक दिवस प्रत्यार्पणापासून दूर राहो. कदाचित या प्रक्रियेला, सहा महिने, एक वर्ष अथवा अनेक वर्षे लागू शकतात, असा दावा त्याने केला. या प्रकरणी आता 8 फेब्रुवारी 2024 रोजी सुनावणी होणार आहे. त्याला पुन्हा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणीला हजर केल्या जाऊ शकते.

याप्रकरणात नीरव मोदी पळाला

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेकडून 14 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतले. या कर्जाची त्याने परतफेड केली नाही. तर मनी लाँड्रिंग प्रकरणात तो आरोपी आहे. त्याला फरार म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सध्या तो ब्रिटनच्या आश्रयाला आहे. गेल्या वर्षी इंग्लंडच्या हायकोर्टाने नीरव मोदीचे अपील फेटाळथ, त्याच्या भारताकडील प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केले.​

Non Stop LIVE Update
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.