भारतीय उत्पादनांचा आता जगभर डंका! Bharat Mart मुळे चीनला झोंबणार मिरच्या

Bharat Mart | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAE चे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईत 'भारत मार्ट' चा श्रीगणेशा केला. यामुळे देशातील लाखो व्यावसायिक आणि कामगारांना फायदा होणार आहे. काय आहे हा भारत मार्ट, मोदी सरकारची योजना काय, चीनला कशी देणार धोबीपछाड? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या..

भारतीय उत्पादनांचा आता जगभर डंका! Bharat Mart मुळे चीनला झोंबणार मिरच्या
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 9:22 AM

नवी दिल्ली | 15 February 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुबई दौऱ्याने चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यामागे मोदी सरकारचा ही खास योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAE चे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईत ‘भारत मार्ट’ची कोनशिला लावली. त्यामुळे भारतातील छोटे उद्योजक, व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच कामगारांन पण मोठा फायदा होणार आहे. चीनच्या ड्रॅगन मार्टला भारत मार्ट हे प्रत्युत्तर आहे. काय आहे भारत मार्ट, त्यातून कसा फायदा होणार, जाणून घेऊयात..

निर्यातीला चालना

भारत मार्ट हे एक वेअर हाऊसिंग सुविधा आहे. भारतीय एमएसएमई कंपन्यांना त्याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे निर्यातील चालना मिळेल. भारतीय SME कंपन्यांना जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्म मिळेल. त्यांना आतंरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहचता येईल. अर्थात जागतिक मानांकनावर खऱ्या उतरणाऱ्या तुमच्या गाव खेड्यातील, शहरातील कंपन्यांना भारत मार्टचा मोठा फायदा होईल.  त्यांची उत्पादनं त्यांना जागतिक पातळीवर विक्री करता येईल. याविषयीची योजना लवकरच समोर येईल.

हे सुद्धा वाचा

काय आहे भारत मार्ट?

भारत मार्ट ही दुबईत भारत सरकारकडून करण्यात येत असलेली चाचपणी आहे. भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर चालना देणे हा यामागील उद्देश आहे. भारतीय पंतप्रधान आणि युएईचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारत मार्टमध्ये भारतीय वस्तूंसाठी शो-रुम, गोदाम, कार्यालय आणि इतर अनेक सुविधा देण्यात येत आहे. या मार्टची देखरेख डीपी वर्ल्डकडून करण्यात येणार आहे.

ड्रॅगन मार्टला टक्कर

दुबईतील भारत मार्ट, चीनच्या ड्रॅगन मार्टला टक्कर देणार आहे. ड्रॅगन मार्ट प्रमाणेच भारत मार्टमध्ये पण एकाच छताखाली अनेक उत्पादने मिळतील. या उत्पादनांचे प्रदर्शन या मार्टमध्ये लागेल. हा मार्ट भारतीय स्थानिक उत्पादकांसाठी त्यांची दर्जेदार उत्पादनं जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी महत्वाची भूमिका निभावेल. भारत मार्ट 2025 पर्यत पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे. हा एक युनिफाईड मंच असेल.

Non Stop LIVE Update
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.