AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर दिवाळीत अनेकांचा बाजार उठला, शेअर मार्केटमध्ये काही तासांत 6 लाख कोटी बुडाले

Share Market Crash : ऐन दिवाळीत म्हणजेच ऐश्वर्य, समृद्धीच्या वातावरणात शेअर बाजारावर मात्र संक्रांत आली आहे. दिवाळीनंतरच्या व्यवहाराच्या पहिल्याच आठवड्यात आणि तेही पहिल्याच दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांना फटका बसत आहे. शेअर बाजारात जोरदार विक्री सुरू आहे. जवळपास सर्वच शेअर्स लाल रंगात ट्रेड करत आहेत. दिवाळीच्या या रोषणाईला कुणाची नजर लागली, असाच प्रश्न सध्या शेअर बाजारात चर्चिला जातोय.

भर दिवाळीत अनेकांचा बाजार उठला, शेअर मार्केटमध्ये काही तासांत 6 लाख कोटी बुडाले
| Updated on: Nov 04, 2024 | 7:55 PM
Share

ऐन दिवाळीत शेअर बाजाराच्या समृद्धीला कुणाची दृष्ट लागली, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, ऐन दिवाळीत शेअर बाजारावर संक्रांत आली आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर 4 नोव्हेंबरला घसरणीसह आठवड्याची सुरुवात झाली. ट्रेडिंग वीकच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ घसरणीसह झाली, पण बाजार उघडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण पहायला मिळाली. या मार्केट क्रॅशमध्ये गुंतवणूकदारांचे 15 मिनिटांत 6 लाख कोटींचे नुकसान झाले.

शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांना फटका बसत असून जोरदार विक्री सुरू आहे. जवळपास सर्वच शेअर्स लाल रंगात ट्रेड करत आहेत. सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला आहे, तर निफ्टीनेही 330 अंकांची घसरण केली आहे.

नेमकं कारण काय?

शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमागे अनेक कारणे असू शकतात आणि नोव्हेंबर मालिका सुरू होताच आयटी शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे आज अधिक कमकुवतपणा दिसून येत आहे. पण यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि यूएस फेडची बैठक.

तुम्हाला माहिती आहे की, या आठवड्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निकालाचा फटका केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेलाही बसणार आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठकही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आहे.

BSE चे मार्केट कॅप घसरले

BSE सेन्सेक्ससाठी परिस्थिती बिकट दिसत असून तो 1040 अंकांच्या घसरणीसह 78,683 वर व्यवहार करत आहे. निफ्टी तब्बल 330 अंकांनी घसरत असून 328 अंकांच्या घसरणीसह 23976 वर व्यवहार करत आहे. बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 6.8 लाख कोटी रुपयांनी घसरून 441.3 लाख कोटी रुपयांवर आले.

‘या’ कंपन्यांच्या शेअरमध्येही घसरण

रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून येत आहे. या कंपन्यांमुळे बाजारात 420 अंकांची घसरण झाली आहे. तर एल अँड टी, अॅक्सिस बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्येही घसरण झाली.

अमेरिकेतील नोकऱ्यांची वाढ जवळपास ठप्प

6 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीमुळे ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील नोकऱ्यांची वाढ जवळपास ठप्प झाल्याने चिंतेत भर पडत आहे. अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये नॉनफार्म पेरोलमध्ये 12,000 नोकऱ्यांची वाढ झाली आहे. ही डिसेंबर 2020 नंतरची सर्वात कमी वाढ आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्थव्यवस्थेत पूर्वीच्या तुलनेत 1,12,000 कमी नोकऱ्यांची भर पडली.

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.