सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेपर्यंत कांद्याचा भाव घसरणार…

दिल्लीत कांद्याची किंमत (Onion Price) 60 रुपये किलोवर पोहोचली आहे. इतकंच नाहीतर महागाईच्या या काळात कांदा आता 100 ते 150 रुपये होणार नाहीत अशी भीती ग्राहकांना सतावत आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी, 'या' तारखेपर्यंत कांद्याचा भाव घसरणार...
कांदा

मुंबई : कांद्याने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा आपला रंग दाखवला आहे. दिल्लीत कांद्याची किंमत (Onion Price) 60 रुपये किलोवर पोहोचली आहे. इतकंच नाहीतर महागाईच्या या काळात कांदा आता 100 ते 150 रुपये होणार नाहीत अशी भीती ग्राहकांना सतावत आहे. पण यावेळी असं होणार नाही. कारण, 15 दिवसांतच मार्केटमध्ये नवीन कांदा दाखल होऊ शकतो. खंरतर, देशात सर्वाधिक कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं. इथल्या शेतकरी नेत्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. (onion prices will come down after 15 days mandi bhav rate maharashtra)

महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लागवड कांद्याची केली जाते. कांदा लागवडीचे तीन हंगाम आहेत. पहिला खरीप आणि दुसरा व तिसरा रब्बी हंगाम. एकूण उत्पादनापैकी 65% कांदा रब्बी हंगामात पिकवला जातो. म्हणून तिसर्‍या हंगामातील कांदा अजून येणार आहे. तर सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे भाव वाढल्याची माहिती देण्यात येत आहे.

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे (Maharashtra Onion Producer Organization) संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी टीव्ही -9 डिजिटलशी बोलताना, रब्बी हंगामातील कांदा बाजारात येणार असून भावही कमी होतील असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या हवामान ठीक आहे. त्यामुळे अशा हवामानात कांद्यांचं चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं. आवक वाढल्यास दर खाली येईल. सध्या महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 30 ते 35 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी न करात पुढील 10 दिवसात दर सामान्य होईल असं सांगण्यात आलं आहे.

का वाढले कांद्याचे दर ?

कांद्याचे भाव वाढण्याचं पहिलं कारण म्हणजे अवकाळी पाऊस. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाच्या दुसऱ्या पेरणीचा कांदा शेतातून येत असताना पाऊस पडला. दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7, 8, 9 आणि 10 जानेवारीला मुसळधार पाऊस पडला. यामुळे कांद्याचं तयार पीकही नष्ट झालं. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान अहमद नगरमध्ये सामान्यपेक्षा 2867 टक्के जास्त पाऊस झाला. त्याचप्रमाणे धुळे येथे 1428, नाशिक 722 आणि पुणे इथं सामान्यपेक्षा 4240 टक्के जास्त पाऊस झाला. यामुळे मंडईत कांद्याची आवक झाली. (onion prices will come down after 15 days mandi bhav rate maharashtra)

संबंधित बातम्या – 

Unit Linked Insurance Plan : विमा तर मिळणारच, वर्षभरात किती रुपये गुंतवल्यावर मिळणार 10 पट परतावा

आता स्पर्श न करता काढा एटीएममधून पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

(onion prices will come down after 15 days mandi bhav rate maharashtra)

Published On - 7:10 am, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI