उत्तर प्रदेशात निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ई-पेन्शन पोर्टलची सुविधा, लाखो लोकांना होणार फायदा, घर बसल्या मिळणार पेंशन

ई-पेन्शन पोर्टल सेवेद्वारे कर्मचा-यांची निवृत्ती सुकर करणारे उत्तर प्रदेश भारतातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेशातील 11 लाख निवृत्त कर्मचा-यांना या योजनेचा फायदा होणार आहे. या अभिनव प्रयोगाचे देशभरातील कर्मचा-यांनी कौतुक केले आहे.

उत्तर प्रदेशात निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ई-पेन्शन पोर्टलची सुविधा, लाखो लोकांना होणार फायदा, घर बसल्या मिळणार पेंशन
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 11:30 AM

ई-पेन्शन पोर्टल सेवेद्वारे कर्मचा-यांची निवृत्ती सुकर करणारे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) भारतातील पहिले राज्य ठरले आहे. ई-पेन्शन पोर्टलची (e-Pension Portal) राज्य सरकारने सुरुवात केली आहे. या पोर्टलवर उत्तर प्रदेश सरकारच्या कर्मचा-यांना निवृत्तीनंतरची सर्व प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. यामुळे पेन्शनच्या संबंधित सर्व कामांमध्ये पारदर्शकता येईल. उत्तर प्रदेशातील 11 लाख निवृत्त कर्मचा-यांना या योजनेचा फायदा होणार आहे. या अभिनव प्रयोगाचे देशभरातील कर्मचा-यांनी कौतुक केले आहे. आता ही ई-पेन्शन पोर्टलसारखी सुविधा प्राप्त झाल्यास राज्यातील 20 लाख कर्मचा-यांना मोठा फायदा होईल. सध्या निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी राज्यात जीवन प्रमाण सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital life certificate) ऑनलाइन सादर करण्याची सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी ही बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे.

युपीत क्रांती

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तंत्रज्ञानावर आधारित सेवांच्या वापरामुळे 25 कोटी लोकांच्या जीवनात क्रांती आल्याचा दावा केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात धक्के खाण्यापासून वाचविण्यासाठी अर्थमंत्रालयाने पेन्शन पोर्टलची सुविधा उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. या पोर्टलमुळे राज्यातील 11.5 लाख निवृत्ती वेतनधारकांना सरळ फायदा झाला आहे.

निवृत्तीपूर्वीच कर्मचा-यांना सुविधा

उत्तर प्रदेश सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या सहा महिन्यांपूर्वीच पेन्शन पोर्टलवर नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतरचे काम सरकारी कर्मचा-यांचे असेल. संबंधित अधिकारी एक महिन्यात त्याची तपासणी करतील. पेन्शन पेमेंट ऑर्डर काढण्यात येईल. त्यानंतर कर्मचा-यांची पेन्शन मंजूर करण्यात येईल. या सर्व प्रक्रियेवर निवृत्तीविभागाचे संचालक लक्ष ठेवतील.

राज्यात जीवन प्रमाण सेवा

डिजिटल जीवन प्रमाणपत्रलाइफ प्रूफ सेंटर जसे की बँका, सरकारी कार्यालये, पोस्ट कार्यालये किंवा लाइफ प्रूफ अ‍ॅप्स Jeevan Pramaan app वर मिळू शकते. https://jeevanpramaan.gov.in/ या संकेत स्थळावरून अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी मंजूर बायोमेट्रिक फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनिंग डिव्हाइस आवश्यक आहे. https://jeevanpramaan.gov.in/ वेबसाइटद्वारे किंवा  अ‍ॅपद्वारे जीवन प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने सादर केली जाऊ शकतात.  त्यासाठी स्वत:ची नोंदणी करावी लागेल. सर्वात आधी लाईफ प्रूफ मोबाईल  अ‍ॅप डाऊनलोड करा. येथे अर्जदाराला आपला आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर किंवा पीपीओ, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि मोबाइल क्रमांक याची माहिती सादर करावी लागेल. त्यानंतर निवृत्ती वेतनाची रक्कम खात्यात जमा होईल.

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.