Income Tax Notice : घरी येईल नाहीतर नोटीस, ITR फाईलिंग करताना टाळा या चुका

| Updated on: Mar 18, 2023 | 8:40 PM

Income Tax Notice : जर तुम्ही पण आयकर खात्याच्या या नियमांकडे दुर्लक्ष केले, आयटीआर भरताना चूक केली तर त्याचा फटका तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही. प्राप्तिकर खात्याची नोटीस तुम्हाला घरबसल्या मिळू शकते.

Income Tax Notice : घरी येईल नाहीतर नोटीस, ITR फाईलिंग करताना टाळा या चुका
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय प्राप्तिकर खाते (Income Tax Department) देशातील लोकांच्या आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवते. जी व्यक्ती कर भरते, तिच्या आर्थिक व्यवहारांवर, आर्थिक कुंडलीचा हा विभाग बारकाईने अभ्यास करते. कर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आयटी रिटर्न (IT Return) भरणे अनिवार्य आहे. आयटीआर (ITR) भरणे त्याच्यासाठी एक कर्तव्यच आहे. आयकर खात्याने आयटीआरसंबंधी काही नियम तयार केले आहेत. जर तुम्ही पण आयकर खात्याच्या या नियमांकडे दुर्लक्ष केले, आयटीआर भरताना चूक केली तर त्याचा फटका तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही. प्राप्तिकर खात्याची नोटीस (Notice) तुम्हाला घरबसल्या मिळू शकते.

तर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची तयारी करत असाल, तर या चुका चुकूनही करु नका. या चुका टाळल्या तर तुम्हाला नोटीस येणार नाही. पण चुकूनही ही चूक केली तर घरबसल्या तुम्हाला प्राप्तिकर खात्याकडून नोटीस प्राप्त होईल. करदात्यांनी आयटीआरमध्ये एकूण संपत्ती, कमाई, उत्पन्न आणि इतर माहिती योग्य पद्धतीन भरणे आवश्यक आहे.

उत्पन्न आणि व्यवहारात तफावत असेल तर

हे सुद्धा वाचा

तुमचे उत्पन्न आणि व्यवहारात तफावत असेल, अनेकदा अचानक काही कमाई होते, उत्पन्न वाढते. त्याविषयीची माहिती आयकर खाते तुमच्याकडून मागवते. जर तुम्ही मर्यादेपेक्षा अधिकचा व्यवहार करत असाल, संपत्तीपेक्षा अधिक रुपयांची खरेदी, गुंतवणूक करत असाल तर आयटीआर भरताना ही माहिती प्रामाणिकपणे भरा.

उशीर झाला तर

जर करदात्याला आयकर वेळेत भरता आला नाही. त्याला निर्धारीत कालावधीत आयकर रिटर्न भरता आला नाही. तर आयटी कायद्याचे कलम 142(1)(i) अंतर्गत त्याला नोटीस पाठविण्यात येते. तसेच त्याला दंड ही आकारण्यात येतो. त्यामुळे निर्धारीत वेळेत आयटीआर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई टळते.

जर करदात्याने योग्य माहिती दिली नाही. त्याच्या माहितीत खाडाखोड असेल, माहितीत तफावत असेल, अर्जात माहिती भरताना ती योग्य वाटली नाही तर आयकर खाते कलम 147 अंतर्गत करदात्याला नोटीस पाठवते.

हे ठेवा लक्षात

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (विलंबित, सुधारित किंवा अपडेट केलेले) भरल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचा पडताळा केला नाही. ते सत्यापित केले नाही. तर आयकर विभाग ते पुढील प्रक्रियेसाठी घेणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचे नसल्याचे गृहीत धरण्यात येईल.