AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी, एसबीआयचा नवा नियम

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एक नवा नियम बनवला आहे. हा नियम कॅश ट्रांजेक्शनच्या संबंधित आहे. आता तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी सबमिट करावा लागणार आहे.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी, एसबीआयचा नवा नियम
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 11:52 AM
Share

मुंबई : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एक नवा नियम बनवला आहे. हा नियम कॅश ट्रांजेक्शनच्या संबंधित आहे. एसबीआयच्या नव्या नियमानुसार तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि जर एटीएममधून दहा हजारांपेक्षा अधिक कॅश काढायची असेल, तर तुम्हाला आता बँकेकडून एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. हा ओटीपी सबमिट केल्यानंतरच तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येतील.

ग्राहकांना मिळणार सुरक्षा 

आपल्या नव्या नियमाबाबत माहिती देताना बँकेंच्या वतीने सांगण्यात आले की, साबर क्राईमच्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. अनेक ग्राहकांना ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेच्या वतीने हा नवा नियम बनवण्यात आला आहे. नव्या नियमामुळे ग्राहकांचा पैसा सुरक्षीत राहाण्यास मदत होणार आहे. तसेच दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असल्याने हा पैसा चुकीच्या हातात जाणार नाही.

काय आहे बँकेचा नवा नियम 

तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला हा नियम लागू  होतो. एसबीआयच्या किंवा इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममधून तुम्हाला रक्कम काढायची असल्यास आता तुम्हाला ओटीपी लागणार आहे. अर्थात ज्या ग्राहकांना दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची आहे, त्यांच्यासाठीच हा नियम  असणार आहे. तुम्ही जेव्हा कॅश काढण्यासाठी एटीएममध्ये आपले कार्ड स्वॅप कराल व रक्कम टाकाल तेव्हा तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकल्यानंतरच तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

संबंधित बातम्या 

दिलासादायक! शेअरबाजारातील पडझडीला ब्रेक; सेन्सेक्स 700 अंकांनी उसळला

ज्या भारतीय सीईओंचा जगभर डंका; ते अग्रवाल, नाडेला, पिचाई नेमके कमवतात किती?

ट्विटरचे CEO म्हणून ज्यांची जगभर चर्चा, त्या पराग अग्रवाल यांचा नेमका पगार किती? कुठे कुठे काम केलंय?

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.