ज्या भारतीय सीईओंचा जगभर डंका; ते अग्रवाल, नाडेला, पिचाई नेमके कमवतात किती?

ज्या भारतीय सीईओंचा जगभर डंका; ते अग्रवाल, नाडेला, पिचाई नेमके कमवतात किती?
सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई

पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ बनताच जगभरात त्यांची चर्चा झाली. अग्रवाल आता अशा भारतीयांच्या यादीमध्ये जाऊन बसले आहेत, ज्यांची जगातील प्रमुख कंपन्यांच्या सीईओपदी वर्णी लागली आहे. त्यांना कंपनीकडून वेतन म्हणून कोट्यावधी रुपये देण्यात येतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 01, 2021 | 10:26 AM

नवी दिल्ली:  जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ट्विटरच्या (Twitter) सीईओ पदाची धुरा मराठमोळ्या पराग अग्रवाल (Parag Agarwal)यांच्या हाती आली आहे. ते यापूर्वी कंपनीमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदावर कार्यरत होते. पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ बनताच जगभरात त्यांची चर्चा झाली. अग्रवाल आता अशा भारतीयांच्या यादीमध्ये जाऊन बसले आहेत, ज्यांची जगातील प्रमुख कंपन्यांच्या सीईओपदी वर्णी लागली आहे. त्यांना कंपनीकडून वेतन म्हणून कोट्यावधी रुपये देण्यात येतात. अग्रवाल यांनी वयाच्या अवघ्या  37 व्या वर्षी ही किमया साधली आहे. पराग अग्रवाल यांचा समावेश आता सुंदर पिचाई, सत्या नाडेला, निकेश अरोरा, शंतनू नारायण  अशा काही प्रमुख भारतीय व्यक्तींच्या नावांमध्ये झाला आहे.

कोणाला किती मिळते वेतन?

37  वर्षीय पराग अग्रवाल यांना ट्विटरकडून आता एक मिलियन डॉलर म्हणजेच साडेसात कोटी रुपये वेतन मिळणार आहे. भारतातील दुसरं मोठं नाव म्हणजे सुंदर पिचाई, 49 वर्षीय सुंदर पिचाई हे अल्फाबेट कंपनीचे सीईओ असून, त्यांना कंपनीकडून तब्बल 281 मिलियन म्हणजे 2144.53 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. जगात सर्वाधिक सॅलरी असलेल्या सीईओंमध्ये पिचाई यांचा दुसरा नंबर लागतो.  सत्या नडेला हे  मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ असून, त्यांना कंपनीकडून 43 मिलियन डॉलर म्हणजेच 306 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.

पराग अग्रवाल यांनी व्यक्त केले आभार 

सोमवारी समोर आलेल्या माहितीनुसार पराग यांना कंपनीकडून तब्बल एक मिलियन डॉलर म्हणजेच साडेसात कोटी रुपये वेतन मिळणार आहे. दरम्यान त्यांच्या वेतनाबाबत वेगवेगळ्या वृत्तपत्राकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार ट्विटरने त्यांना 1.52 मिलीयन डॉलर इतके वेतने दिले आहे.  ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डॉर्सी यांचे आभार मानले आहेत. जॅक आणि मी चांगले मित्र आहोत. अजूनही आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जॅकचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खरच जॅक यांचे आभार मानतो असे पराग यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागले; आता मोजावी लागणार इतकी किंमत

ट्विटरचे CEO म्हणून ज्यांची जगभर चर्चा, त्या पराग अग्रवाल यांचा नेमका पगार किती? कुठे कुठे काम केलंय?

25 लाखात सुरू केला उद्योग; आज 100 कोटींची उलाढाल, जाणून घ्या ‘मामा अर्थ’ बद्दल

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें