OYO Business Model: ओयो पैसा कसे कमवते, कसा होतो कंपनीला बक्कळ फायदा
OYO Business Model: सुट्टीसाठी किंवा बिझनेस ट्रिपची योजना आपल्या मनात येते तेव्हा हे नाव आपल्या सर्वांना माहीत असते. पण तुमच्यापैकी काहींना OYO Rooms या भारतातील सर्वात मोठी आणि स्मार्ट हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या प्रवासामागील कथा माहीत नसेल. जाणून घ्या OYO चा प्रवास.

OYO हे आता सगळ्यांना माहित असलेलं नाव बनलं आहे. तुमच्यापैकी अनेकांनी OYO च्या माध्यमातून रुम बुकिंग केल्या असतील. पण तुम्हाला देखील कधी ना कधी एक प्रश्न पडला असेल की, ओयो ही कंपनी पैसा कसा कमवत असेल. ओयोचे बिझनेस मॉडेल काय आहे. OYO Rooms ही भारतातील सर्वात प्रख्यात आणि सक्षम हॉस्पिटॅलिटी कंपनी कशी बनला. हे सर्व एका साध्या कल्पनेने कसे सुरू झाले. Oyo ची स्थापना कोणी केली. तर सुरुवातीला सांगू इच्छितो की, ओयोची सुरुवात 2013 मध्ये रितेश अग्रवाल या 20 वर्षीय विद्यार्थ्याने केली होती. रितेश अग्रवालने एक लहान स्टार्टअप म्हणून या कंपनीची सुरुवात केली होती. पण आता ही कंपनी जगभरात पसरली आहे. Oyo चे बिझनेस मॉडेल हे सजग प्रवाशांना परवडणारी, दर्जेदार निवास व्यवस्था देणारी आणि सवलतीच्या दरात खोल्या देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंपनी हॉटेल आणि इतर निवास प्रदात्यांसोबत भागीदारी करते. प्रवासी ओयो वेबसाइट किंवा ॲपद्वारे या हॉटेलमध्ये खोल्या बुक करू शकतात. ...
