OYO हॉटेल्स आता घरे देखील भाड्याने देणार, अशी आहे ही योजना
ओयो कंपनीच्या व्हॅकेशन होम यूनिट 'बेलविला बाय ओयो' ने ऑस्ट्रेलियन शॉर्ट-टर्म रेंटल कंपनी MadeComfyचे अधिग्रहण केले आहे. ही डील कॅश आणि समभाग अशा दोन्ही स्वरुपात झाली आहे. त्यामुळे ओयो कंपनीचे मुल्य सुमारे 5 अब्ज डॉलर इतके झाले आहे.या डीलनंतर आता OYO वर शॉर्ट टर्मवर भाड्याची घरे मिळणार आहेत.

ओयो हॉटेल सर्वात सर्वात स्वस्त राहण्याची व्यवस्था करण्यात पुढे असतात. परंतू आता ओयो नागरिकांना हॉटेल्स रुम्सच्या जोडीला भाडे तत्वांवर राहायला घरेही देणार आहे. ओयोच्या व्हेकेशन होम मॅनेजमेंट युनिट बेलविया बाय ओयोने (Belvilla by OYO) आंतराष्ट्रीय विस्तारीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियाची शॉर्ट टर्म रेंटल प्लॅटफॉर्म मेडकॉम्फीचे अधिग्रहन करण्यात आले आहे. हा करार कॅश आणि स्टॉक समभाग दोन्हींच्या एकत्रितपणे करण्यात आला आहे. या डीलमधून आयोची पॅरेंट कंपनी ओरावेल स्टेडच्या एक्स्ट्राऑर्डीनरी जनरल मिटींगमध्ये या कराराला मंजूरी देण्यात आली आहे.
या अधिग्रहणानुसार ओयो सुमारे १.९ दशलक्ष डॉलरचे ( सुमारे १६ कोटी रुपये ) शेअर जारी करणार आहे. प्रत्येक शेअरची किंमत ०.६७ डॉलर असणार आहे.( सुमारे १६ कोटी रुपये ) या आधारे ओयो कंपनीची व्हॅल्युएशन सुमारे ५ अब्ज डॉलर ( सुमारे ४२,५०० कोटी रु.) होणार आहे.या शिवाय कंपनी दोन वर्षांनंतर ९.६ दशलक्ष डॉलर ( सुमारे ८१ कोटी रुपये ) आणखीन शेअर देणार आहे.काही रोख रक्कमही दिली जाणार आहे. परंतू त्यासंदर्भात नेमकी माहीती देण्यात आलेली नाही.
काय काम करते ऑस्ट्रेलियाची कंपनी
मेडकॉम्फी या कंपनीची सुरुवात सबरीना बेथुनिन आणि क्विरिन श्वाइघोफर यांना साल 2015 मध्ये सुरु केली होती. ऑस्ट्रेलियात 1,200 हून अधिक प्रॉपर्टीज व्यवस्थापन कंपनी करते. या कंपनीचे ऑफिस सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन, पर्थ आणि एडलेट येथे आहेत.ही कंपनी न्यूझीलँड शहरातील उदा. ऑकलँड, वेलिंग्टन आणि हॅमिल्टन येथेही सक्रिय आहे.साल 2024 मध्ये मेडकॉम्फी कंपनीची महसुल जवळपास ९.६ मिलियन डॉलर होता.
मेडकॉम्फी शॉर्ट-टर्म रेंटल प्रॉपर्टीजची मॅनेजमेंट सर्व्हीस देते आणि प्रॉपर्टी इन्वेस्टर्सला चांगले उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते. या नव्या अधिग्रहणामुळे OYO कंपनी आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड मोठ्या बाजारपेठेत एण्ट्री मिळाली आहे.
२० देशांमध्ये ५० हजार हॉलिडे होम्स
ओयोने २०१९ मध्ये युरोपियन लिझर ग्रुप विकत घेतला होता, त्यात बेलाविला ब्रँड सहभागी होता. त्यानंतर या युनिटला “बेलविला बाय ओयो” या नावाने संचालित केले जात आहे. बेलव्हीलामध्ये २० युरोपीय देशांत ५०,००० हून अधिक हॉलिडे होम्स आहेत.
याव्यतिरिक्त, डिसेंबर २०२४ मध्ये, OYO ने G6 हॉस्पिटॅलिटी $५२५ दशलक्ष मध्ये विकत घेतली आहे, ज्यामुळे त्यांना अमेरिका आणि कॅनडामध्ये १,५०० हून अधिक फ्रेंचायझी हॉटेल्स मिळाली आहेत. अशाप्रकारे, ओयो आंतराष्ट्रीय विस्तार करत चालली आहे.
