AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card : सावधान! पॅन कार्ड बाबत ही चूक केल्यास होऊ शकतो 10 हजारांचा दंड

Pan Card 2.0 : केंद्र सरकारने आयकर प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी पॅन 2.0 नावाची एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीकडे बनावट पॅनकार्ड असेल तर त्याची माहिती समजणार आहे.

Pan Card : सावधान! पॅन कार्ड बाबत ही चूक केल्यास होऊ शकतो 10 हजारांचा दंड
Pan Card Rule
| Updated on: Nov 21, 2025 | 9:12 PM
Share

पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकेशी संबंधित कामांसाठी पॅनकार्डची आवश्यकता असते. अशातच आता केंद्र सरकारने आयकर प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी पॅन 2.0 नावाची एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे आता आयकर विभागाला एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा जास्त पॅनकार्ड असतील तर त्याची माहिती समजणार आहे. कायद्यानुसार, एका व्यक्तीकडे दोन किंवा अधिक पॅन कार्ड असणे मोठा गुन्हा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक लोक दोन किंवा जास्त पॅनकार्डच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. जर तुमच्याकडे चुकून दोन पॅन कार्ड असतील, तर तुम्हाला 10000 रुपयापर्यंत दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या नावावर डुप्लिकेट पॅन आहे की नाही हे तपासा आणि असेल ते ताबडतोब परत करा.

पॅन-2.0 मध्ये डुप्लिकेट पॅन कसे शोधते?

  • क्यूआर कोड – नवीन पॅन कार्डमध्ये एक डायनॅमिक क्यूआर कोड असणार आहे. कर विभागाने तो स्कॅन केल्यास पॅनकार्ड वैध आहे की नाही याची माहिती समजणार आहे.
  • रिअल-टाइम व्हेरिफिकेशन – पॅन कार्ड तयार होताना आधार आणि इतर डेटा व्हेरिफाय केला जाईल.

तुमच्या नावावर दोन पॅन कार्ड असतील काय करावे?

  • स्टेप 1 – आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा.
  • स्टेप 2 – PAN Status Check वर क्लिक करा
  • स्टेप 3 – तुमचा पॅन क्रमांक टाका आणि तुमच्या नावावर इतर कोणतेही पॅन आहेत का ते तपासा.

डुप्लिकेट पॅन कसे सरेंडर करायचे?

जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर…

  • स्टेप 1 – NSDL/UTIITSL वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप 2 – PAN Change / Correction / Surrender फॉर्म (49अ) भरा.
  • स्टेप 3 – कोणता पॅन नंबर सुरू ठेवायचा आहे आणि कोणता बंद करायचा आहे याची माहिती द्या.
  • स्टेप 4 – सरेंडर केलेल्या पॅनची आणि सक्रिय पॅनची झेरॉक्स सबमिट करा
  • स्टेप 4 – गरज असल्यात पत्ता आणि ओळखपत्र सबमिट करा.

डुप्लिकेट पॅन साठी किती दंड आहे?

तुमच्या नावावर दोन (किंवा अधिक) पॅनकार्ड असतील, तर आयकर कायद्याच्या कलम 272 B अंतर्गत 10000 पर्यंत दंड होऊ शकतो. मात्र तुम्ही चुकून दुसरे पॅन कार्ड तयार केले असेल (जुने हरवले असेल), तर सरेंडर करताना तसे स्पष्टीकरण द्या, असे केल्यास तुमचा दंड माफ होऊ शकतो. मात्र इतर प्रकरणांमध्ये तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.