Patanjali Share Price : पतंजली कंपनीची शेअर बाजारात कमाल, तब्बल 9000 कोटी कमवले!
नुकतेच पतंजली फुड्स या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जारी केले आहेत. पतंजली फुड्स या कंपनीचा शेअर सध्या 52 आठवड्याच्या विक्रमी नीचांकापेक्षा जास्त आहे.

Patanjali Foods Share Price : योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली फुड्स या कंपनीचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. या कंपीने शेअर बाजारातही मोठी कमाल केली आहे सधारण 200 दिवसांत या कंपनीचे समभाग विक्रमी नीचांकी पातळीवरून साधारण 16 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून या कंपनीचे मूल्यांकन साधारण 9 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. गेल्या काही दिवसांत या कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. याच कारणामुळे कंपनीचे मूल्यांकनदेखील वाढले आहे. सध्या या कंपनीच्या शेअरचे मूल्य 600 रुपयांपेक्षा जास्त आहे.
विक्रमी नीचांकी पातळीवरून शेअर किती रुपयांनी वाढला?
नुकतेच पतंजली फुड्स या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जारी केले आहेत. पतंजली फुड्स या कंपनीचा शेअर सध्या 52 आठवड्याच्या विक्रमी नीचांकापेक्षा जास्त आहे. आकडेवारीनुसार 28 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीच्या समभागाचे मूल्य 522.81 रुपये या 52 आठवड्यांतील सर्वाधिक नीचांकी पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर कंपनीच्या समभागांत हळूहळू वाढ झालेली पाहायला मिळते. आकडेवारीनुसार या कंपनीच्या शेअरचे मूल्य सध्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा 16 टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच सध्या 52 आठवड्यांच्या नीचांकी समभाग मूल्याच्या तुलनेत सध्या या कंपनीच्या समभागांत 83 रुपयांची वाढ झाली आहे. आगामी काळातही या कंपनीच्या समभागांच्या मूल्यांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कंपनीचे मूल्यांकनात 9000 कोटींपेक्षा जास्त वाढ
या कंपनीच्या शेअरमध्ये जशी वाढ नोंदवली गेली, तशाच पद्धतीने या कंपनीचे मूल्यांकनदेखील वाढलेले आहे. 28 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता तेव्हा या कंपनीचे मूल्यांकन 56,872.74 कोटी रुपये होते. आता 18 सप्टेंबर रोजी याच कंपनीच्या समभागाचे मूल्य 605.65 रुपये झाले असून बाजार भांडवल 65,884.31 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच पतंजली फुड्स या कंपनीच्या बाजार भांडवलात एकूण 9,011.57 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 65,500 कोटी रुपये रुपयांपेक्षा काहीसे कमी आहे. सध्या विचार करायचा झाल्यास या कंपनीच्या शेअरचे मूल्य सध्या 597.40 रुपये आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)
