Saral Pension Yojana : फक्त एकदाच करा पेमेंट आणि आयुष्यभर मिळेल पेंशन, प्रीमियमही मिळेल रिटर्न

ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे, म्हणजेच पॉलिसी घेताना तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळते. (Pay only once and you will get a lifetime pension, premium and return)

Saral Pension Yojana : फक्त एकदाच करा पेमेंट आणि आयुष्यभर मिळेल पेंशन, प्रीमियमही मिळेल रिटर्न
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 9:34 AM

नवी दिल्ली : सरल पेन्शन योजना 1 एप्रिल 2021 पासून सुरु झाली आहे. विमा नियामक आयआरडीएआय(IRDAI)ने सर्व विमा कंपन्यांना एक स्टँडर्ड एन्युटी प्रोडक्ट आणण्यास सांगितले होते. ज्याचे नियम व अटी एकसमान, पारदर्शक आणि सोप्या असाव्यात. आता हे प्रोडक्ट बाजारात दाखल झाले आहे. वास्तविक, विमा कंपन्या विमा पॉलिसी आणि पेन्शन योजना वेगवेगळ्या नावाने विकतात. सामान्य व्यक्तीला त्यांच्या विविध कठिण अटी समजत नाहीत आणि ते मिससेलिंगचे शिकार होतात. म्हणूनच, आयआरडीएआयने असे प्रोडक्ट आणण्याचा विचार केला जे कोणतीही कंपनी ते विकले तरीसुद्धा त्याचे नियम, वैशिष्ट्ये आणि फायदे नेहमी समान असतील. याला सरल पेन्शन योजना असे म्हणतात. तथापि, विमा कंपन्या स्वतंत्रपणे प्रीमियम घेऊ शकतात. (Pay only once and you will get a lifetime pension, premium and return)

सरल पेन्शन योजना म्हणजे काय?

ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे, म्हणजेच पॉलिसी घेताना तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, सिंगल प्रीमियमची रक्कम त्याच्या / तिच्या नॉमिनीला परत केली जाते. सरल पेंशन योजना ही एक इंटरमिजिएट एन्युटी योजना आहे, म्हणजेच पॉलिसी घेताच आपल्याला पेन्शन मिळणे सुरू होते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जितक्या पेन्शनपासून सुरुवात होते तितकीच पेन्शन पूर्ण आयुष्य मिळते.

या पेन्शन योजनेचे दोन प्रकार

सिंगल लाईफ – यात पॉलिसी एका व्यक्तीच्या नावे असेल, जोपर्यंत पेन्शनर जिवंत राहील तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळेल, त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल.

जॉईंट लाईफ – यात दोन्ही पार्टनरचे कव्हरेज आहे. जोपर्यंत प्राथमिक पेंशनधारक जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळणारच आहे. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या जोडीदारास आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे, त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला देण्यात येईल.

कोण घेऊ शकेल सरल पेन्शन योजनेचा लाभ?

या योजनेचा भाग होण्यासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल 80 वर्षे आहे. ही संपूर्ण आयुष्यासाठी पॉलिसी असल्याने, पेंशनधारी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत पेन्शन संपूर्ण आयुष्यभर मिळेल. सरल पेन्शन पॉलिसी सुरु होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

पेन्शन कधी मिळणार?

पेंशन केव्हा मिळणार हे पेंशन धारकालाच ठरवायचे आहे. यात तुम्हाला 4 पर्याय मिळतील. आपण दरमहा पेन्शन घेऊ शकता, दर तीन महिन्यांनी घेऊ शकता, दर 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांत एकदा घेऊ शकता. आपण जो पर्याय निवडाल, त्या काळात आपली पेन्शन येणे सुरू होईल.

किती पेन्शन मिळेल?

आता प्रश्न उद्भवतो की या सरल पेन्शन योजनेसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, तर हे आपल्यालाच निवडावे लागेल. म्हणजेच आपण ज्या रकमेची पेन्शन निवडाल त्यानुसार पैसे द्यावे लागतील. तुम्हाला दरमहा पेन्शन पाहिजे असल्यास किमान 1000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल, तीन महिन्यांसाठी 3000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6000 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 12000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल. कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही.

कर्जही घेऊ शकता

आपल्याला गंभीर आजार असल्यास आणि उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्यास आपण सरल पेन्शन योजनेत जमा केलेली रक्कम काढू शकता. आपल्याला गंभीर आजारांची यादी दिली आहे, ज्यासाठी आपण पैसे काढू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर बेस प्राईझच्या 95% हिस्सा रिटर्न दिला जातो. या योजनेंतर्गत (सरल पेन्शन योजना) कर्ज घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. योजना सुरु झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. (Pay only once and you will get a lifetime pension, premium and return)

इतर बातम्या

Apple Event 2021 | आयफोन 12 सिरीजचे 4 फोन लॉन्च; आयफोन 12 मिनी जगातील सर्वात पातळ आणि हलका 5 जी स्मार्टफोन

Sara Ali Khan Janhvi Kapoor workout | सारा अली खान, जान्हवी कपूर हॉट अँड स्लिम का दिसतात ?, ‘हा’ व्हिडीओ पाहाच

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.