AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm कडून 2 मिनिटांत घ्या 2 लाख रुपये, धमाकेदार आहे सुविधा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

आपण बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यास, प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागतो. यासह, अशी अनेक कागदपत्रे मागितली जातात, जी आपण पूर्ण देखील करू शकत नाही.

Paytm कडून 2 मिनिटांत घ्या 2 लाख रुपये, धमाकेदार आहे सुविधा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
paytm
| Edited By: | Updated on: Apr 06, 2021 | 1:24 PM
Share

मुंबई : बर्‍याचदा असे घडते की आपल्याला अचानक पैशांची आवश्यकता आहे. यावेळी, आपण बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यास, प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागतो. यासह, अशी अनेक कागदपत्रे मागितली जातात, जी आपण पूर्ण देखील करू शकत नाही. जर अशी परिस्थिती आपल्यासोबत येत असेल तर पेटीएम आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल, कारण आता तुम्ही पेटीएमकडून कर्ज घेऊ शकता. (paytm instant loan know how can you take 2 lakh rupees loan from paytm)

काही महिन्यांपूर्वी पेटीएमने लोकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे पेटीएमच्या काही खास ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत त्वरित कर्ज दिले जाते, त्यातील खास बाब म्हणजे या कर्जासाठी आपल्याला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला काही मिनिटांत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत कर्ज कसे घेता येईल याबद्दल जाणून घेऊयात…

पूर्ण ऑनलाईन सेवा

या पेटीएम कर्जात संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाते. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जाची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 2 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि काही क्षणात आपल्या खात्यामध्ये पैसे येतात. तुम्ही पेटीएमच्या या खास सुविधेचा फायदा नॅशनल हॉलिडे आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीही घेऊ शकता. खरंतर, कोणत्याही दिवशी तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

कोणत्या लोकांना मिळणार कर्ज?

कर्जाची ही सुविधा नोकरी करणाऱ्या, छोटे व्यवसाय करणाऱ्या आणि प्रोफेशनल लोकांना मिळणार आहे. यामध्ये तुमच्या क्रेडिट स्कोरच्या आधारे कर्ज देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही नोकरी किंवा व्यायवसायिक असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

पेटीएसच्या या कर्जाला तुम्हाला 18-36 महिन्यांमध्ये परत करावं लागणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार पेमेंट करू शकता. कंपनीने ही खास सुविधा ग्राहकांना देण्यासाठी NBFC आणि बँकांसोबत भागिदारी केली आहे.

कसे घेऊ शकता कर्ज ?

जर तुम्हाला पेटीएमद्वारे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला पेटीएम अ‍ॅपच्या फायनान्शियल सर्व्हिसेस विभागात जाऊन आणि नंतर पर्सनल लोन टॅबवर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर, तुम्हाला विचारलेली माहिती भरावी. यावर लगेच तुम्हाला तुम्ही किती कर्ज घेऊ शकता असं दाखवलं जाईल. (paytm instant loan know how can you take 2 lakh rupees loan from paytm)

संबंधित बातम्या – 

पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार? या 5 कारणांमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली

Gold Price Today : एक महिन्यात सगळ्यात महाग झालं सोनं, पटापट चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

फक्त 10 हजारात घर बसल्या सुरू करा ‘हा’ बिझनेस, प्रत्येक महिन्याला बक्कळ पैसा कमवाल

(paytm instant loan know how can you take 2 lakh rupees loan from paytm)
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.