AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार? या 5 कारणांमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली

देशाच्या राजधानीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना लक्षात घेता नाईट कर्फ्यू लावण्याची चर्चा आहे.

पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार? या 5 कारणांमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली
| Edited By: | Updated on: Apr 06, 2021 | 11:51 AM
Share

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सरकारसह लोकांमध्ये चिंता वाढत आहे. खरंतर, महाराष्ट्रात लॉकडाउन आणि अनेक शहरांमध्ये रात्रीच्या बंदीनंतर संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती लोकांना वाटत आहे. दुसरीकडे, देशाच्या राजधानीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना लक्षात घेता नाईट कर्फ्यू लावण्याची चर्चा आहे. गेल्या वेळी लॉकडाऊनमुळे उद्योग, लोकांच्या व्यवसायासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम झाला होता, आता लोक हळू हळू सावरत आहेत. पण आता पुन्हा लॉकडाऊन घातल्यास काय होईल याची चिंता सर्वसामान्यांना वाटत आहे. (Coronavirus Lockdown violation know how lockdown effects in april month)

छोटे व्यवसाय बंद होण्याची भीती

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका छोट्या दुकानदार आणि लघुउद्योगांवर होणार आहे. याआधीच्या लॉकडाऊनमध्येही या प्रकाराचा सर्वाधिक परिणाम झाला होता. फक्त दिल्ली एनसीआरबद्दल बोलायचे झाले तर लॉकडाऊनमधील जवळपास 10 टक्के लघु उद्योग बंद झाले. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन झालं तर सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

नोकरीचा धोका

लॉकडाऊन पुन्हा झालं तर त्याचा फटका कामगार वर्गालाही सहन करावा लागू शकतो. सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी, सीएमआयईच्या आकडेवारीनुसार गेल्या वेळी लॉकडाऊनमध्ये कोट्यवधी लोकांनी नोकरी गमावली. फक्त 2020 च्या जुलै महिन्यात जवळपास 50 लाख लोकांच्या नोकर्‍या गमावल्या. ज्यामुळे कोरोना व्हायरस साथीच्या आणि लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या लोकांची संख्या 1.89 कोटींवर पोहचली आहे. त्याच वेळी एप्रिल 2020 मध्ये 1.77 कोटी लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आणि मेमध्ये जवळपास 1 लाख लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या.

अर्थव्यवस्थेवर संकट

लॉकडाउननंतर, इकॉनॉमी व्हील हळू हळू रिकव्हरी मोडकडे परत येत आहे. परंतु पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास जीडीपी, मॅन्युफॅक्चरिंग, उद्योगाच्या वेगासह सर्व महत्वाच्या बाबींवर परिणाम होईल ज्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. लॉकडाऊनमुळे देशाची जीडीपी नकारात्मक झाली होती. जी आता हळू हळू सकारात्मकतेत येत आहे.

वेतनवाढीवर परिणाम

लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम त्या कर्मचार्‍यांवरही होऊ शकतो, ज्यांची नावनोंदणी मागील वर्षातदेखील झाली नव्हती. खरंतर, अशा नोकरदार यावर्षी वाढीची अपेक्षा करत आहेत. यावर्षी पगार वाढेल पण पुन्हा लॉकडाऊन झालं तर मात्र नागरिकांसाठी हा मोठा धक्का असणार असणार आहे.

लग्नसराई थांबेल…

गेल्या वेळी लॉकडाउन होता तेव्हा एप्रिलमध्ये लग्न करण्याचा हंगाम होता. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरंतर, हा व्यवसाय हंगामी आहे. आता लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे आणि लोकांनी प्री बुकिंग केली आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनसारखा निर्णय घेतल्यास काय होईल याची त्यांना आता भीती आहे. (Coronavirus Lockdown violation know how lockdown effects in April month)

संबंधित बातम्या – 

Gold Price Today : एक महिन्यात सगळ्यात महाग झालं सोनं, पटापट चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

फक्त 10 हजारात घर बसल्या सुरू करा ‘हा’ बिझनेस, प्रत्येक महिन्याला बक्कळ पैसा कमवाल

UPI व्यवहार झाला रद्द तर बँक रोज देईल 100 रुपये, इथे करा तक्रार

(Coronavirus Lockdown violation know how lockdown effects in April month)
Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न