AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SEBIच्या नोटीसप्रकरणी Paytm उत्तर, मीडिया रिपोर्ट्सवर काय म्हटलं?

पेटीएमला सेबीने नोटीस पाठवल्याची गेल्या आठवड्यात जोरदार चर्चा होती. त्यामुळे पेटीएमचं काय होणार? असंही बोललं जात होतं. पण या नोटिशीच्या चर्चांवर पेटीएमने उत्तर दिलं आहे. ही नोटीस आजची नाही. नव्याने कोणतीही नोटीस आली नाही. नोटीस जुनीच आहे, असं पेटीएमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

SEBIच्या नोटीसप्रकरणी Paytm उत्तर, मीडिया रिपोर्ट्सवर काय म्हटलं?
PaytmImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2024 | 1:09 PM
Share

फिनटेक कंपनी पेटीएमने मीडियात सुरू असलेल्या सर्व बातम्या नाकारल्या आहेत. पेटीएमला मार्केट रेग्युलेटर सेबीकडून नवीन नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पेटीएमच्या आयपीओमध्ये सुरू असलेल्या अनियमिततेवर सेबीने ही नोटीस पाठवली आहे, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. पेटीएमने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. या बातम्या धांदात खोट्या असून त्यात काहीही तथ्य नसल्याचं पेटीएमचं म्हणणं आहे.

सेबीकडून आम्हाला नवीन नोटीस आलीच नाही, असं पेटीएमचं म्हणणं आहे. जानेवारी-मार्च तिमाहीच्या काळात सेबीकडून आम्हाला एक नोटीस आली होती. त्याचं उत्तर आम्ही नुकत्याच झालेल्या वार्षिक आर्थिक रिणामांमध्ये दिलं आहे, असं पेटीएमने म्हटलं आहे.

मीडिया रिपोर्ट चुकीचा

पेटीएम ब्रँडचे मालक वन97 कम्युनिकेशन्सने मीडियात सुरू असलेल्या बातम्यांचं खंडण केलं आहे. ही काही नवीन घडामोड नाही. पेटीएमने लिस्टेड कंपनी म्हणून सर्व महत्त्वाची आणि आवश्यक माहिती सार्वजनिक केली आहे. सेबीच्या नोटिशीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे फायनान्शिअल स्टेटमेंटमध्ये दिली आहेत. त्यात सर्व दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, असं वन97 कम्युनिकेशन्सने म्हटलं आहे.

सेबीशी सातत्याने संवाद

आम्ही मार्केट रेग्युलेटर सेबीशी सातत्याने संवाद साधून आहोत. या प्रकरणात ते माहिती घेत आहेत. सेबीच्या सर्व प्रासंगिक नियम-विनियमचं पालन करण्याचं कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, असंही पेटीएमने म्हटलं आहे.

फायनान्शिअल रिझल्टवर परिणाम नाही

सेबीच्या नोटीशीची चर्चा फक्त मीडियात होत आहे. त्याचा कंपनीच्या जानेवारी-मार्च तिमाही आणि एप्रिल-जून तिमाहीच्या आर्थिक धोरणावर परिणाम होणार होणा नाही. सेबीच्या संबंधित नोटिशीवरून आम्ही स्वत: सक्रियपणे काम करत आहोत. याबाबत पुरेशी कायदेशीर सल्ला घेऊनच आम्ही पुढील कार्यवाही करू असं पेटीएमने म्हटलं आहे. पेटीएम देशातील सर्वात मोठी फिनटेक कंपनीपैकी एक आहे. या कंपनीने 2021मध्ये शेअर बाजारात आयपीओ आणला होता. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ होता. 18,300 कोटीचा हा आयपीओ होता.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.