PayTM ची भन्नाट योजना, तगडा व्याजदर, अवघ्या 100 रुपयात सुरु करा FD मध्ये गुंतवणूक

विशेष म्हणजे जर तुम्ही काही महिन्यानंतर एफडी ब्रेक केली तर तुमच्याकडून कोणताही अतिरिक्त दंड आकारला जात नाही. (PayTM Payments Bank Fixed deposit Scheme)

PayTM ची भन्नाट योजना, तगडा व्याजदर, अवघ्या 100 रुपयात सुरु करा FD मध्ये गुंतवणूक
paytm
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 3:34 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी पेमेंट्स बँक अशी ओळख असणारी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (Paytm Payments Bank) ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) करण्याची सुविधा देत आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत तुम्ही कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करत एफडी सुरु करु शकता. पेटीएम पेमेंट्स बँक एफडीवर 5.5 टक्के व्याज देते. पेटीएमने स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. (PayTM Payments Bank Fixed deposit Scheme)

PPBL आणि इंडसइंड बँकेच्या सहकार्याने पेटीएम ग्राहकांना ही नवी सुविधा देत आहे. यात ग्राहक कमीत कमी 100 रुपये गुंतवू शकतो. विशेष म्हणजे जर तुम्ही काही महिन्यानंतर एफडी ब्रेक केली तर तुमच्याकडून कोणताही अतिरिक्त दंड आकारला जात नाही.

दोन लाखांपर्यंत शिल्लक ठेवण्याची मर्यादा

पेटीएम बँकेच्या वेबसाईटनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेमेंट्स बँकेचे परवाना आणि ऑपरेटिंग दिशानिर्देशांनुसार, कोणत्याही पेटीएम ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये दिवसाअखेरपर्यंत एकूण शिल्लक ही दोन लाखांहून अधिक असू नये. या संमतीच्या आधारावरच पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) इंडसइंड बँक लिमिटेडसह भागीदारीने एफडीची सुविधा देईल.

फिक्स्ड डिपॉजिटची वैशिष्ट्ये

>> पेटीएम पेमेंट्स बँक फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी 365 दिवसांसाठी आहे. >> या मॅच्युरिटीवरील व्याज 6 टक्के आहे. >> यात पासबुकची सुविधादेखील उपलब्ध आहे.

तसेच ग्राहकांना अधिक व्याज देणारी मुदतपूर्ती कालावधीसह एफडी बुक करता येणार आहे. तुम्ही कधीही तुमची एफडी रिडीम करु शकता. मात्र रिडीम केल्यानंतर तुमच्या मूळ रक्कमेवरील व्याजातून टीडीएस कपात केला जाईल. त्यानंतर शिल्लक रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

जर तुम्ही एखादी एफडी मुदतीपूर्व बंद केली, तर एफडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. तसेच मॅच्युरिटीपूर्वी एफडीचे आपोआप नूतनीकरण होईल. एफडीचे दर आणि कालावधी हा पेटीएम पेमेंट्स बँकेमार्फत कळविला जाईल. (PayTM Payments Bank Fixed deposit Scheme)

संबंधित बातम्या : 

PHOTO | 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.20 टक्के व्याज, कोणत्या बँकेचा किती व्याजदर?

Investment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना

PPF आणि NPS कशात सर्वाधिक फायदा? जाणून घ्या निवृत्तीनंतरची सर्वोत्तम योजना

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.