PHOTO | 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.20 टक्के व्याज, कोणत्या बँकेचा किती व्याजदर?

पैशांची बचत करण्यासाठी अनेकांची पहिली पसंती ही फिक्‍स्‍ड डिपॉझिट (Fixed Deposit) या योजनेला असते. तुमच्या मुदत ठेवींवर मिळणारा परतावा आणि सुरक्षा या दोन कारणांमुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. (Fixed Deposit Interest Rates calculator Best FD Rates of Top Banks)

1/7
पैशांची बचत करण्यासाठी अनेकांची पहिली पसंती ही फिक्‍स्‍ड डिपॉझिट (Fixed Deposit) या योजनेला असते. तुमच्या मुदत ठेवींवर मिळणारा परतावा आणि सुरक्षा या दोन कारणांमुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. आपण एकदा एफडीमध्ये पैसे गुतंवले तर त्यानंतर निश्चित कालावधीसाठी त्या मूळ किंमतीवर निश्चित दराने व्याज जमा होतो. अनेक बँकांचे एफडी दर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरणावर अवलंबून असतात.
2/7
bank-
अल्प कालावधीसाठीही ग्राहकांना एफडीमध्ये गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला गुंतवलेल्या रक्कमेसह योग्य परतावाही मिळतो. सध्या अशा अनेक बँका आहेत, ज्या तुम्हाला सहा महिन्यांच्या एफडीवर चांगला व्याज देतात.
3/7
बँक ऑफ बडोदा ही 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेच्या गुंतवणूकवर 6 महिन्यांसाठीच्या एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 5 टक्के आहे. त्याशिवाय दुसरीकडे, इंडसइंड बँक ही 2 कोटी रुपयांच्या एफडीवर 6 महिन्यांसाठी 4.50 टक्के व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर 5 टक्के इतका आहे. या दरम्यान जर तुम्ही 6 महिन्यांसाठी 1 ते 5 कोटी रुपयांची एफडीवर premature withdraw या तत्त्वावर घेतली तर तुम्हाला 4.35 टक्के व्याज मिळतो.
4/7
कॅनरा बँक हा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेसाठी 6 महिन्यांच्या एफडीवर 4.45 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 4.95 टक्के आहे. तर बंधन बँक 6 महिन्यांपेक्षा कमी एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 5.25 टक्के आहे.
5/7
आयडीएफसी फर्स्ट बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी 6 महिन्यांच्या एफडीवर दरवर्षाला 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 5 टक्के आहे. तर आरबीएल बँक अशा एफडीवर आपल्या ग्राहकांना 4.75 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 5.25 टक्के आहे.
6/7
खासगी क्षेत्रातील बँक Yes Bank ने आपल्या FD चे दर बदलले आहेत. नव्या दरांनुसार बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेसाठी 6 महिन्यांच्या एफडीवर 5 टक्के दराने व्याज देत आहे.
7/7
तर डीसीबी बँक ही 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेवर 6 महिन्यांच्या एफडीसाठी सर्वाधिक व्याज देत आहे. या बँकेत 6 महिन्यांच्या एफडीसाठी 5.70 टक्के दराने व्याज दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा हाच दर 6.20 टक्के आहे.