AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm Q4 Results 2024-25 : फिनटेक कंपनीचा घाटा घटला, 81 कोटींचा नफा; आकडे जारी

पेटीएमने जाहीर केलेल्या Q4 FY25 तिमाही निकालांमध्ये कंपनीचा घाटा कमी होऊन 545 कोटी रुपये झाला आहे. ऑपरेशनल कमाईत घट असली तरी, खर्चातील कपात आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील उत्पन्नातील वाढीमुळे कंपनीला दिलासा मिळाला आहे. EBITDA 81 कोटींचा नफा दाखवला आहे, तर ऑपरेशनल महसूल 5 टक्के वाढला आहे.

Paytm Q4 Results 2024-25 : फिनटेक कंपनीचा घाटा घटला, 81 कोटींचा नफा; आकडे जारी
paytm Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 06, 2025 | 7:30 PM
Share

Paytm Q4 Results : भारतीय फिनटेक क्षेत्रातील अग्रेसर कंपनी पेटीएम (Paytm) ने मार्च 2025ने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा घाटा कमी होऊन 545 कोटी रुपये राहिला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत तो 551 कोटी होता. ऑपरेशनलमधील कमाईत घट झाली आहे. पण खर्चातील कपात आणि फायनान्शियल सर्व्हिसने उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च 2025 तिमाहीत कंपनीची एकूण ऑपरेटिंग रक्कम 1,911.5 कोटी राहिली. ती गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या 2,267.1 कोटीच्या तुलनेत सुमारे 15.7 टक्क्यांनी कमी आहे. पण या तिमाहीत कंपनीने ESOPपूर्वी EBITDA (व्याज, कर, घसारा आणि इतर वजावटीपूर्वीचा नफा) 81 कोटींचा नफा दाखवला आहे.

Q4 FY25 मध्ये मिळालेल्या UPI प्रोत्साहनासह EBITDA रुपये 81 कोटी इतका होता. मात्र, हे प्रोत्साहन वगळता EBITDA तिमाहीतून तिमाहीत 51 कोटींची सुधारणा होत 11 कोटी झाला आहे. कंपनीने या तिमाहीत 522 कोटींचा अपवादात्मक खर्च केला, त्यात 492 कोटींचा एकवेळचा, नॉन-कॅश ESOP खर्च आणि 30 कोटींची उपकंपन्यांमधील गुंतवणुकीवरील घसारा समाविष्ट होता.या अपवादात्मक खर्चांचा विचार केल्यानंतर कंपनीचा करानंतर नफा (PAT) (23) कोटींवर पोहोचला आहे. UPI प्रोत्साहन आणि एकवेळचा खर्च वगळल्यास PAT मध्ये 115 कोटींची तिमाही सुधारणा होत (93) कोटी झाला आहे.

ऑपरेशनल महसूल वाढला

पेटीएमचा Q4 FY25 मध्ये ऑपरेशनल महसूल 5 टक्के वाढून 1,911 कोटींवर गेला. योगदान नफा (Contribution Profit) 12 टक्के वाढून 1,071 कोटी झाला असून, योगदान मार्जिन 56 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. आर्थिक सेवा क्षेत्रातील महसूल 9 टक्क्यांनी वाढून 545 कोटी झाला, तर व्यापारिक कर्ज वितरण 4,315 कोटींवर पोहोचले आहे. यातील 50 टक्क्याहून अधिक कर्जे पुनः कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिली गेली, ज्यामुळे मजबूत क्रेडिट परफॉर्मन्स आणि ग्राहक धारणा दर्शवली जाते.

पेमेंट्स विभागात स्थिर परतावा

पेमेंट्स विभागानेही स्थिर परतावा दिला आहे. या विभागातील नेट पेमेंट मार्जिन 578 कोटी झालाय. यात 70 कोटी यूपीआय प्रोत्साहन समाविष्ट आहे. प्रोत्साहन वगळल्यास हा मार्जिन 508 कोटी असून, तिमाहीत 4 टक्के वाढलेला आहे. पेटीएमकडे तिमाही अखेरीस 12,809 कोटींचा अत्यंत चांगला रोख साठा होता, जो भावी वाढीसाठी बळकटी देतो.

कंपनीने ग्राहक आणि व्यापारी वापर वाढवण्यात सातत्य दाखवले. Q4 मध्ये GMV (Gross Merchandise Value) 5.1 लाख कोटींवर पोहोचले, तर दरमहा अॅक्टिव्ह युजर्स (MTUs) 7.2 कोटींपर्यंत वाढले. पेमेंट डिव्हाइसेस वापरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या तिमाहीत 8 लाखांनी वाढून एकूण 1.24 कोटींवर पोहोचली आहे. पेटीएमने तांत्रिक नेतृत्वही बळकट केले आहे. कंपनीने भारतातील पहिला सोलर साउंडबॉक्स आणि महाकुंभ साउंडबॉक्स सादर करून आपल्या नवोन्मेष नेतृत्वाला अधिक बळ दिलं आहे. हे नवीन उत्पादने केवळ साउंडबॉक्स श्रेणीत पेटीएमचं वर्चस्व अधोरेखित करतात असे नाही, तर व्यापाऱ्यांमध्ये वित्तीय सेवांचे वितरण वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.