महाराष्ट्र नाही तर या राज्यातील लोक कमवतात जादा पैसा, सरासरी मासिक उत्पन्न 50 हजार
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश, कर्नाटक वा तामिळनाडू यासारखी राज्ये पुढे नसून प्रती व्यक्ती उत्पन्नात एक छोटेसे राज्य पुढे आहे. त्या राज्याचे नाव ऐकूण तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

देशात सर्वाधिक प्रगत राज्य असलेले महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्नात (Per Capita Income) मात्र नंबर वन नाही. देशाची राजधानी दिल्ली देखील याबाबत पुढे नाही. परंतू एका छोट्या राज्याने सर्व राज्यांना मागे टाकत दरडोई उत्पन्नात नंबर वन मिळवला आहे. सिक्कीम राज्याने हा विक्रम केला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मागे टाकले आहे. सिक्कीम प्रत्येक नागरिकाचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे 5.9 लाख रुपये आहे. जे इतर राज्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे. विशेष म्हणजे सिक्कीमचे सकल घरगुती उत्पन्न ( जीएसडीपी ) म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेचा आकार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या तुलनेत खूपच छोटा आहे. तरी देखील लोकसंख्या कमी असल्याने तेथील दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक आहे.
दिल्ली दुसऱ्या तर गोवा तिसऱ्या क्रमांकावर
दिल्लीने आर्थिक ताकदीत रँकींगच्या बाबतीत मोठी झेप घेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. येथे प्रति व्यक्ती उत्पन्न 4,93,024 रुपयांपर्यंत पोहचले आहे. जे गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत 7.3% जास्त आहे. याआधी गोवा दुसऱ्या क्रमांकावर होते. ( ताजी आकडेवारी जाहीर होणे शिल्लक आहे ) टाईम्सच्या वृत्तानुसार जर नवीन आकडेवारीत गोवा जर पुन्हा पुढे गेला तरी दिल्ली टॉप – 3 मध्ये कायम राहाणार आहे.
दरडोई उत्पन्न रँकींग
सिक्कीममध्ये वार्षिक सरासरी उत्पन्न 5.9 लाख रुपये आहे. दुसऱ्या स्थानावर दिल्ली आणि तिसऱ्या स्थानावर गोवा आहे. तर मोठी राज्यातील तामिळनाडूत प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न सरासरी 3.2 लाख रुपये, हरियाणात 3.3 लाख रुपये आणि कर्नाटकात देखील सरासरी 3.3 लाख रुपये आहे.
दिल्लीचा GSDP देशात 11 व्या स्थानावर
दिल्ली सरकारच्या अहवालानुसार दिल्लीचे सकल घरगुती उत्पादन 12 कोटी रुपये आहे. या यादीत दिल्ली देशात 11 व्या स्थानावर आहे. तर सर्वात वर महाराष्ट्र आहे, त्यानंतर तामिळनाडू दुसरा आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिल्ली श्रीमंत का होत आहे ?
राजधानी दिल्ली श्रीमंत होण्यामागे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दिल्लीची लोकसंख्या केवळ 1.6 टक्के आहे. परंतू देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत सुमारे 3.7 टक्क्यांचे योगदान देते. याचा अर्थ लोकसंख्येच्या तुलनेत दिल्लीची अर्थ व्यवस्था खूप मोठी आहे.
