आताच उघडा ‘या’ योजनेमध्ये खातं, मोफत मिळणार 10 लाखांचा वैयक्तिक विमा

आताच उघडा 'या' योजनेमध्ये खातं, मोफत मिळणार 10 लाखांचा वैयक्तिक विमा
बँक

देशातील कॅशलेस अर्थव्यवस्थेला (Cashless Economy) चालना देण्यासाठी मोदी सरकारने याची सुरूवात केली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 21, 2021 | 9:41 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 2014 मध्ये जनधन योजनेला सुरुवात केली. या योजनेचं खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये शून्य बॅलन्सवर बचत खातं उघडता येतं. या योजनेंतर्गत आतापर्यंत 41 कोटी लोकांनी खाती उघडली आहेत. या खात्यांमध्ये किमान बॅलेन्स शिल्लक ठेवण्याची गरज नसते. म्हणूनच या खात्याला ग्राहकांनी परवानगी दिली आहे. देशातील कॅशलेस अर्थव्यवस्थेला (Cashless Economy) चालना देण्यासाठी मोदी सरकारने याची सुरूवात केली होती. या कार्ड्सद्वारे ग्राहकांना 10 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षण दिले जाते. (personal banking rupay card 10 lacs rupees insurance in sbi state bank of india online)

मोफत मिळणार 10 लाख रुपयांचा विमा

रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (RuPay Select Credit Card) घेतल्यानंतर तुम्हाला 10 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देण्यात येणार आहे. एसबीआय (SBI)आणि पीएनबीसह (PNB) सगळ्याच प्रमुख सरकारी बँका हे कार्ड जारी करत आहेत. एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI), अ‍ॅक्सिस बँकेसह अनेक खाजगी बँकाही हे कार्ड देत आहेत.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास खाते धारकाला किंवा त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण दिलं जातं. रुपे कार्ड हे दोन प्रकारचे असतात. क्लासिक आणि प्रीमियम क्लासिक. या कार्डवर 1 लाख रुपये आणि प्रीमियमवर 10 लाखांपर्यंतचे कव्हर आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : https://www.rupay.co.in/sites/all/themes/rupay/document/Insurance-Cover-RuPay-Debit-Cards.pdf

शुन्य बॅलेन्सवर हे खातं उघडलं जाऊ शकतं. यामध्ये अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत. या खात्यासह रुपे एटीएम कार्ड, दोन लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचा लाइफ कव्हरही देण्यात आला आहे. इतकंच नाही तर खात्यात जमा झालेल्या रकमेवरही व्याज मिळेल.

या खात्यामध्ये 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधासुद्धा देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा आहे. अधिक माहितीनुसार, या खात्याच्या 6 महिन्यांपर्यंत समाधानकारक ऑपरेशननंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तर सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे पैसे थेट खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे.

म्हणजेच या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये सरकार कोणत्याही योजनेचा डायरेक्ट बेनिफिट पाठवला जाईल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल निवृत्तीवेतन योजना यासारख्या योजनांचा लाभ जनधन योजनेंतर्गत मिळू शकतो. (personal banking rupay card 10 lacs rupees insurance in sbi state bank of india online)

संबंधित बातम्या –

अ‍ॅमेझॉनला मोठा फटका, सेबीने रिलायन्स फ्यूचर ग्रुपच्या कराराला दिली मंजूरी

Banking Alert | HDFC ग्राहकांनो लक्ष द्या! महत्त्वाचे व्यवहार लवकर उरका, काही तासांसाठी बंद राहणार ‘या’ सेवा…

(personal banking rupay card 10 lacs rupees insurance in sbi state bank of india online)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें