AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Savings Account Balance Limit : बचत खात्यात किती पैसे ठेवले पाहिजे? 50/30/20 चा गोल्डन नियम काय? जाणून घ्या

बँक खात्याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. बँक खात्यात पैसे ठेवण्याआधी बचतीचा गोल्डन नियम समजून घ्या.

Savings Account Balance Limit : बचत खात्यात किती पैसे ठेवले पाहिजे? 50/30/20 चा गोल्डन नियम काय? जाणून घ्या
| Updated on: Aug 08, 2026 | 11:43 AM
Share

अनेक जण त्यांच्या कमाईचा महत्वाचा भाग बचत खात्यात ठेवतात. अनेकांना बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित वाटते. परंतु बँक खात्यात जास्त पैसे ठेवणेही नुकसानदायक ठरू शकते. अनेकांच्या मनात बचत खात्यात किती पैसे ठेवले पाहिजे, याबाबत अनेक शंका असतात. या बचत खात्यातील पैसे कधी खर्च केले पाहिजे, याविषयाचा विशेष गोल्डन नियम जाणून घ्या.

बचत खाते अनेकांच्या आर्थिक सुरक्षेचा पाया आहे. खरंतर याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही या खात्यातून कधीही पैसे काढू शकता. या खात्यात पैसे ठेवल्याने व्याज देखील मिळते. वेगवेगळ्या बँकेत बचत खात्याच्या व्याजदरात फरक पाहायला मिळतो. पगार, बिल भरणे, दररोजच्या छोट्या-मोठ्या खर्चासाठी बचत खाते महत्त्वाचे ठरते.

बचत खात्यात किती पैसे ठेवले पाहिजे?

बचत खात्यात फक्त 1 ते 2 महिन्याच्या खर्चाचे पैसे ठेवणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही 50/30/20 गोल्डन नियमांचं पालन करू शकता.

काय आहे 50/30/20 बजेटिंगचा नियम?

50 टक्के भाग : घर भाडे, इएमआय, महिन्याचे रेशनची किंमत, विजेचं बिल, विमा, शिक्षण, इतर खर्चाचे पैसे ठेवणे फायदेशीर ठरेल.

30 टक्के भाग : हॉटेल जेवण, पिकनिक आणि मनोरंजनासाठी पैसे ठेवू शकता.

20 टक्के भाग : आपत्कालीन फंड, म्यूचुअल फंड, एफडी किंवा भविष्यासाठी गुंतवणूक

बँकेच्या बचत खात्यात जास्त पैसे का ठेऊ नये?

तुम्ही बचत खात्यात गरजेपेक्षा अधिक पैसे ठेवल्यास नुकसानदायक ठरू शकते. महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. परंतु सरकारी आणि खासगी बँकेचं व्याज हे महागाई दरापेक्षा कमी असते. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या पैशांची क्रयशक्ती दरवर्षी कमी होते. कमी व्याज दर असलेल्या खात्यात पैसे ठेवण्याऐवजी एफडी किंवा जादा व्याजदार मिळणाऱ्या योजनेत पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते.

बचत खात्यातील आपात्कालीन फंडचा वापर कधी करावा?

अचानक नोकरी गमावल्यानंतर या फंडचा वापर करता येऊ शकतो. मेडिकल इमरजेंसी असतानाही या पैशांचा वापर करता येईल. घर किंवा वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी बचत खात्यातील पैसे वापरता येऊ शकते.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?