AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? ट्रम्प यांच्या एका खेळीने भूकंप… कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या किती?

Crude Oil Prices Fall down: मध्य-पूर्वेतील तणावा दरम्यान एक मोठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने जागतिक कच्चा तेलाच्या बाजारात खळबळ उडाली आहे. क्रूड ऑईलच्या किंमतीत घसरण झाली आहे.

मोठी आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? ट्रम्प यांच्या एका खेळीने भूकंप... कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या किती?
कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 21, 2026 | 12:30 PM
Share

Crude Oil Prices Fall down: येत्या काही दिवसात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची दाट शक्यता आहे. एका जागतिक घडामोडीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. तर अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यानंतर क्रूड ऑईलच्या दर झरझर खाली आले. इराणसोबत मोठा करार होणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले. त्यानंतर ब्रेंट क्रूड भाव घसरून 105 डॉलर प्रति बॅरलवर तर अमेरिकेन बेंचमार्क वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट (WTI) घसरून 99 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला आहे.

ट्र्म्प यांच्या त्या वक्तव्याने घसरण

कच्चा तेलाच्या बाजार नरमला आहे. वॉश्गिंटनमध्ये याविषयीच्या घाडमोडी घडल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. वॉश्गिंटन आणि तेहराणमध्ये चर्चा सुरू असून लवकरच याविषयीचा करार पूर्ण होईल असे ट्रम्प म्हणाले. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण तयार झाले. इराण आणि अमेरिकेतील युद्ध संपण्याची चिन्ह निर्माण झाले. तर एक महत्त्वाचा अडथळा लवकरच दूर करण्यात येईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. पश्चिम आशियातून कच्च्या तेलाचा पुरवठा आता सुरळीत होण्याची चिन्ह दिसताच ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत घसरण दिसली.

होर्मुज हे जगासाठी संधीचे दार

फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला होता. तेव्हापासून कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास 40 टक्क्यांची वाढ झाली. तेल व्यावसायिक कंपन्यांना गेल्या अनेक दिवसांपासून होर्मुज समुद्रधुनी(Strait of Hormuz) उघडण्याची प्रतिक्षा होती. जगभरात याच मार्गे इंधन पुरवठा होतो. कच्चा तेलाचा पाचवा हिस्सा या भागातून जगभरात पोहचतो. पण गेल्या दोन महिन्यापासून पुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पण ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हा मार्ग लवकरच सुरू होण्याच्या आशा बळवल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीला देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली. सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी वधारले. तर त्यानंतर 90 पैशांची त्यात भर पडली. जवळपास 4 रुपयांनी इंधनाचे दर वाढले. तर विरोधक इंधनाचे भाव अजून कडाडणार असल्याचा दावा करत आहेत. या घडामोडींमुळे जनता मात्र हैराण झाली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ