मोठी बातमी! पेट्रोल डिझेलाच भाव थेट निम्म्यापर्यंत कमी होणार? सामान्यांना दिलासा देणारी अपडेट समोर
भविष्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाता आहे. विशेष म्हणजे सध्याच्या तुलनेत पेट्रोल डिझेलचा भाव थेट अर्धा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी एकदा कमी होतात असा प्रश्न सामान्यांना नेहमीच पडतो. कधीकाळी एक लिटर पेट्रोल अवघ्या 60 रुपयांना मिळायचे. आता याच एक लिटर पेट्रोलसाठी 100 पेक्षा जास्त रुपये द्यावे लागतात. म्हणूनच या इंधनाची किंमत कमी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आता हीच अपेक्षा पूर्णत्त्वास येण्याची शक्यता आहे. फायनॅन्शियल सर्व्हिस देणाऱ्या जेपी मॉर्गनने सांगितलेले भाकित खरे ठरले तर पेट्रोल आणि डिझेलची किंमत थेट अर्धी होऊ शकते. त्यामुळेच जेपी मॉर्गनच्या या भाकिताकडे देशातील जनतेने लक्ष वेधू घेतले आहे.
ब्रेंट क्रुड ऑईलचा भाव 30 डॉलर्सपर्यंत घसरू शकतो
पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत भारतासाठी एक चांगली बातमी आहे. अमेरिकेतील दिग्गज कंपनी जेपी मॉर्गनने एक भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी सत्यात उतरली तर पेट्रोल आणि डिझेलची किंमत सध्याच्या भावाच्या तुलनेत थेट अर्धी होईल. जेपी मॉर्गनच्या दाव्यानुसार 2027 सालापर्यंत ब्रेंट क्रुड ऑईलचा भाव 30 डॉलर्सपर्यंत घसरू शकतो. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ होणार असल्यामुळे ब्रेंट क्रुड ऑईलचा भाव कमी होऊ शकतो. आगामी तीन वर्षात तेलाचा वापर वाढणार आहे. तेलाचा वापर वाढणार असला तरी इंधन म्हणून तेलाचा उपयोगही वाढणार आहे. भविष्यात ओपेक+ देशांसह इतरही देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. उत्पादनात वाढ झाल्यामुळे बाजारात कच्चे तेल उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढेल. परिणामी कच्च्या तेलाची किंमत कमी होईल.
भारतात पेट्रोल-डिझेलचा भाव कसा कमी होणार?
भारत पेट्रोल, डिझेल तसेच इतर इंधनाच्या निर्मितीसाठी एकूण गरजेच्या साधारण 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा भाव कमी झाल्यामुळे भारतातील इंधन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कच्चे तेल कमी किमतीत उपलब्ध होईल. त्यामुले तेल कंपन्यादेखील पेट्रोल-डिझेलचा भाव कमी करण्यास सक्षम असतील. त्यामुळेच भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार 2027 सालापर्यंत ब्रेंट क्रुड ऑईलची किंमत 30 डॉलर्सपर्यंत कमी होऊ शकते. सध्या हाच भाव 60 डॉलर्स प्रति बॅरल आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
