AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : स्वप्नच दाखवली फार, पेट्रोल-डिझेलचे कधी कमी होणार दर

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याविषयी केंद्र सरकारने स्वप्नच दाखवली. रग्गड नफा कमाविणाऱ्या तेल कंपन्यांनी अद्यापही इंधनाचे दर कमी केलेले नाही. काय आहेत अपडेट भाव..

Petrol Diesel Rate Today : स्वप्नच दाखवली फार, पेट्रोल-डिझेलचे कधी कमी होणार दर
आजचा भाव काय
| Updated on: Jul 01, 2023 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात गेल्या वर्षीपेक्षा कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) सडकून आपटले. भारतीय तेल विपणन कंपन्या सध्या फायद्यात आहेत. रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदी करुन युरोपियन देशात त्याची विक्री करुन कंपन्या नफ्यात आल्या आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारने हजारो कोटींचे अनुदान पेट्रोलियम कंपन्यांना दिले होते. कंपन्या फायद्यात असल्या तरी देशातील जनतेला त्याचा काहीच दिलासा मिळाला नाही. गेल्या वर्षीपासून पेट्रोल-डिझेलचा भाव 100 रुपयांच्या आतबाहेर आहे. प्रत्येक राज्यानुसार त्यात तफावत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी करण्याविषयी केंद्र सरकारने स्वप्नच दाखवली. रग्गड नफा कमाविणाऱ्या तेल कंपन्यांनी अद्यापही इंधनाचे दर कमी केलेले नाही. काय आहेत अपडेट भाव..

कच्चे तेलाची उसळी आज सकाळीच 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले आहेत. जागतिक बाजारात कच्चा तेलात चढउतार आहे. 1 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 70 डॉलर प्रति बॅरल झाला होता. या किंमती घसरणीवर आहेत.

इतकी झाली घसरण मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. नवीन वर्षात कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण अनेक महिने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.93 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.01 रुपये तर डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  • भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  • देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  • त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  • पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  • इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  • बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  • त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  • त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  • एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा