AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्या

ईपीएफओने आपल्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे काही प्रकरणात पीएफची रक्कम पूर्णपणे काढता येते. या प्रकरणात क्लेम रिजेक्ट होत नाही आणि गरजेवेळी हातात रक्कम पडण्याची आशा असते.

EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्या
EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्याImage Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 08, 2026 | 7:49 PM
Share

नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे पैसे पीएफ खात्यात जमा होतात. कंपनी आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तीची ठरावीक रक्कम दर महिन्याला खात्यात जमा होते. त्यामुळे गरजेवेळी ही रक्कम नोकरदार व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते. असं असताना ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना दिलासा दिला आहे. पीएफ खात्यातील रक्कम पूर्णपणे काढण्याची प्रक्रिया आणखी सुलभ केली आहे. नव्या नियमानुसार, पात्र सदस्य आता विशिष्ट प्रकरणात कारण न देता संपूर्ण रक्कम काढू शकतील. ईपीएफओच्या मते, या नव्या बदलामुळे क्लेम नाकारण्याचं प्रमाण कमी होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना गरजेवेळी आर्थिक मदत होणार आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, ईपीएफओने सदस्य-स्नेही सुधारणांचा भाग म्हणून पीएफ काढण्याच्या नियमात बदल केला आहे.

पीएफधारकांना पूर्वी पीएफची रक्कम काढण्यासाठी कारण द्यावं लागत होते. तसेच यासाठी आवश्यक आणि संबंधित कागदपत्र, पुरावे जोडावे लागत होते. अशा स्थितीत क्लेम योग्य श्रेणीत नसल्यास दावे फेटाळले जायचे. त्यामुळे आपल्याच पैशांसाठी हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. आता नव्या नियमानुसार, पात्र सदस्य कोणतेही कारण न देता विशेष प्रकरण श्रेणीअंतर्गत अर्ज करू शकतात. यामुळे प्रक्रिया आणखी सोपी होईल आणि कर्मचाऱ्यांना सहज निधी मिळेल.

कोणत्या प्रकरणात पीएफ पूर्ण काढू शकता?

ईपीएफओच्या मते, काही विशेष स्थितीत 100 टक्के पीएफ रक्कम काढण्याची परवानगी आहे. कंपनी 15 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ बंद असेल आणि कर्मचाऱ्यांना कोणताही मोबादला न देता बेरोजगार व्हावं लागलं असेल. कंपनीकडून दोन महिन्यांहून अधिक काळ पगार झाला नसेल आणि त्याचं कारण हे संप नसेल, तर ती व्यक्तीही पीएफ काढू शकते. नोकरीवरून काढलं असेल किंवा कॉस्ट कटिंगमध्ये कर्मचाऱ्याचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असेल तर पूर्ण पीएफ काढू शकता. दीर्घ काळ कंपनी बंद असेल आणि बेरोजगारीची स्थितीही या श्रेणीत येते. गंभीर आजार आणि कौटुंबिक उपचारासाठीही हा नियम लागू आहे.

असेच पैसे काढण्यासंदर्भात काय आहे नियम?

ईपीएफओने स्पष्ट केलं की, ही सुविधा फक्त विशेष स्थितीत वापरता येईल. सामन्य स्थितीत पैसे काढायचे झाले तर जास्तीत जास्त 75 टक्के रक्कम काढता येईल. तसेच विशेष प्रकरणात पात्रतेचे निकष पूर्ण केल्यास संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली