AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लास्टिक नोटा लवकरच बाजारात! RBI चे मोठे पाऊल, कागदी नोटा होणार हद्दपार?

RBI Plastic Notes Update: भारतात लवकरच प्लास्टिक नोट येण्याची शक्यता आहे. नोटांची छपाई करणारी BRBNMPL ने पॉलिमर शीटच्या पुरवठ्याविषयी निविदा मागवल्या आहेत. या नोटा सुरक्षित, टीकाऊ तर असतीलच पण त्या लवकर खराबही होणार नाहीत. काय आहे सरकारची योजना?

प्लास्टिक नोटा लवकरच बाजारात! RBI चे मोठे पाऊल, कागदी नोटा होणार हद्दपार?
प्लास्टिक नोटा लवकरच बाजारात! RBI चे मोठे पाऊल
| Updated on: Jul 18, 2026 | 1:39 PM
Share

RBI Plastic Polymer Notes: भारतात प्लास्टिक चलनाविषयी, नोटांविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) प्लास्टिक म्हणजे पॉलिमर नोटा आणण्यासाठी मोठे पाऊल टाकले आहे. RBI ची नोटा छापणारी कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटिडेने (BRBNMPL) जगभरातील कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. या कंपन्यांना असे पॉलिमर शीट तयार करावे लागतील, ज्यात अत्याधुनिक सुरक्षेचे मानंक पूर्ण केलेले असतील. भविष्यात या शीटआधारे भारतीय नोटा छापल्या जाऊ शकतात. माध्यमातील दाव्यानुसार, ही योजना लागू झाली तर भारतात पहिल्यांदा कागदांऐवजी प्लास्टिक नोटांचा वापर होईल. अद्याप RBI ने प्लास्टिक नोटांविषयी कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाही.

सुरक्षेवर सर्वाधिक लक्ष

RBI ने या निविदा प्रक्रियेत राष्ट्रीय सुरक्षेशीसंबंधित कडक नियम केले आहेत. निविदा सादर करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षेची मंजूरी घ्यावी लागेल. पॉलिमर शीट तयार करण्यासाठी कोणताही माल, साहित्य हे चीन वा पाकिस्तानातून येणार नाही याची हमी द्यावी लागेल. याशिवाय भारतासाठी तयार करण्यात येत असलेले साहित्य तिसऱ्या देशासाठी वापरता येणार नाही. ज्या कंपन्यांना प्लास्टिक नोटासंदर्भात किमान तीन वर्षांचा अनुभव अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या कंपन्यांना असा अनुभव आहे, त्यांनाच हे काम देण्यात येणार आहे.

अगोदर होणार चाचणी

RBI अगोदर पॉलिमर नोटांची चाचणी करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास 68,000 रीम पॉलिमर शीटची गरज आहे. त्याआधारे दोन वेगवेगळ्या मूल्याच्या नोटा छापल्या जातील. जर ही चाचणी प्रक्रिया यशस्वी ठरली तर मग मोठ्या प्रमाणावर पॉलिमर शीटची खरेदी करण्यात येणार आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 जून रोजी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर देशात प्लास्टिक नोटाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले होते. पण अद्याप त्यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. केंद्रीय रिझर्व्ह बँक या योजनेचे फायदे आणि नुकसानीचा अभ्यास करणार आहे. सध्या ही योजना सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

जगातील इतक्या देशात प्लास्टिक नोटा

जगातील अनेक देशात प्लास्टिक नोटांचे प्रचलन आहे. जवळपास 60 देशात पॉलिमर बँक नोटांचा वापर होतो. सर्वात अगोदर 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाने 10 डॉलरची प्लास्टिक नोट छापली होती. सिंगापुर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशियापर्यंत अनेक देशात पास्टिक नोटांचा वापर होत आहे. युरोपमध्ये रोमानियाने 1998 मध्ये पहिल्यांदा प्लास्टिक नोटेचा वापर झाला. कॅनडामध्ये 2011 मध्ये प्लास्टिक नोटा चलनता आल्या. अमेरिकेत डॉलर पूर्णपणे प्लास्टिकचा नाही, तर काही नोटा या कॉटन-लिननच्या आहेत.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा