PM मोदींचं काटकसरीचं आव्हान…किती दिवसांचा उरलाय LPG, पेट्रोलचा साठा? हॉर्मुज़ संकटात मोठी अपडेट काय?

LPG Petrol Diesel Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन काटकसरीचे आव्हान केलं आहे. त्यामुळे देशात काळजीचा सूर उमटला आहे. नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण देशात पेट्रोल आणि डिझेलचा आणि एलपीजीचा किती साठा उरला आहे? काय आहे मोठी अपडेट

PM मोदींचं काटकसरीचं आव्हान...किती दिवसांचा उरलाय LPG, पेट्रोलचा साठा? हॉर्मुज़ संकटात मोठी अपडेट काय?
एलपीजी, पेट्रोल-डिझेलचा किती उरलाय साठा
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 12, 2026 | 12:38 PM

LPG Price in India: जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या काटकसरीच्या सल्ल्याने चिंतेत असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी जागतिक ऊर्जा बाजारात सुरू असलेल्या ऊर्जा संकटावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम आशियाच्या संकटादरम्यान त्यांनी नागरिकांसाठी आनंदवार्ता दिली आहे. सध्या देशात 60 दिवस पुरेल इतके क्रूड ऑईल आणि नॅचरल गॅसचा साठा असल्याचे जैन यांनी सांगितले. याशिवाय देशात 45 दिवस पुरेल इतका एलपीजी साठा असल्याचे सांगण्यात आले आहे.

पेट्रोल-डिझेल, गॅसचा नाही तुटवडा

पेट्रोलियम सचिवांनी देशात पेट्रोल, डिझेल अथवा गॅसचा तुटवडा असल्याचे वृत्त फेटाळले. देशात इंधनाचे कोणतेही राशनिंग होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या अनौपचारिक गटाची (IGoM) पाचवी बैठक झाली. यादरम्यान जागतिक पुरवठा साखळीत अडचण येत असल्याने ऊर्जा संकटाबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर संरक्षणमंत्र्यांनी देशात कोणतेही इंधन संकट नसून पेट्रोलियम उत्पादनांची कोणतीही कमी नसल्याचे स्पष्ट केले.

अनेक देशात पेट्रोलच्या भावात मोठी उसळी

इराण युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये इंधनाच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. पण भारतात इतका मोठा संघर्ष सुरू असतानाही गेल्या 70 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. तेल कंपन्यांना दररोज जवळपास 1,000 कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. एका अंदाजानुसार, 2026 मधील पहिल्या तिमाहिती तेल कंपन्यांचे एकूण नुकसान 2 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचले. पीएम मोदी यांनी देशातील लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या वापराबाबत सल्ला दिला आहे. इंधनाची बचत करण्याचे, सोने न खरेदी करण्याचे, खाद्यतेल कमी वापरण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. मेट्रो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कारपुलिंगसारख्या पर्यांयाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले आहे.

भारतासाठी कडवे आव्हान

जर अमेरिका-इराण संघर्ष अजून ताणल्या गेला. युद्ध जरी थांबले पण संघर्ष सुरूच राहिला तर देशापुढे मोठे ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. देशावरील आर्थिक बोजा कमी करण्याची गरज आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. त्यामुळे देशापुढे कडवे आव्हान आहे. होर्मुज समुद्रधुनीतील पेचप्रसंग अजूनही निवाळलेला नाही. अशा परिस्थिती देशाने आयातीवरील अवलंबत्व कमी करणे फायद्याचे ठरणार असल्याचा सरकारचा सूर आहे.

Follow Us